महिलेला बघितले ... ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण

 






महिलेला बघितले ... ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण

◾व्हिडिओ ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव (कापरी) येथे महिलेला बघितले म्हणून  मजुराला ट्रॅक्टरला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ वायरल होत आहे.

या व्हिडिओत अमानुष मारहाण करतांना दिसत आहे, आणि हात पाय ट्रॅक्टर ला बांधून व कोयता दाखऊन गावात व परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील कामगार पाणी पुरवठा विभागाच्या कामासाठी बेलगाव येथे असतांना महिलेला बघितले या कारणासाठी एकाच कुटुंबातील सहकाऱ्यांनी कामगाराला ट्रॅक्टर ला बांधून कोयता दाखवून, अंगावर डिझेल, पेट्रोल टाकून जीवानिशी मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली आहे.



सदर व्हिडिओ बाबतची माहिती घेतली असता तो व्हिडिओ ब्रह्मपुरी तालुक्यातील बेलगाव ( कापरी ) येथील असल्याचे निष्पन्न झाले. ब्रह्मपुरी तालुकातील बेलगाव येथे नळ पाणीपुरवठा योजने काम सुरू आहे. त्या कामाचे कांत्राकटर बीड जिल्ह्यातील जगताप कॉन्ट्रॅक्टदाराला मिळाले आहे. त्यांच्याकडे कामगार म्हणून बीड निवासी हा मजूर काम करण्याकरिता बेलगाव येथे आला आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी बेलगाव गाठले. आणि मजूर व आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. बराचवेळ दोघांनाही तक्रार न केल्याने  पोलिसांना गुन्हे दाखल करण्यात विलंब झाला. परंतु समाजमाध्यमवर वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांवर दबाव वाढला. त्यामुळे  कांत्राटदार जगताप यांनी तक्रार दाखल करताच आरोपी एकाच कुटुंबातील दिनेश काशिनाथ अवसरे, निलेश काशिनाथ अवसरे, गणेश काशिनाथ अवसरे या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. त्या मजुराला चामड्याचा बेल्टने अमानुषपणे मारहाण केल्यानंतर एका व्यक्तीजवळ असलेल्या धारदार कोत्याने त्याला कपडे काढून मारहाण करण्याचा प्रयत्न होता अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा तपास ब्रह्मपुरी  पोलीस निरीक्षक अंबारे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments