सट्टेबाजांवर पोलिसांनी धडक कारवाई; दोन सट्टेबाजांना अटक

 



सट्टेबाजांवर पोलिसांनी धडक कारवाई; दोन सट्टेबाजांना अटक

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : घुग्घुस शहरात मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरू असून त्यावर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. घुग्घुस शहरातील मुख्य चौक असलेल्या बस स्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी सट्टे धारकाकडून पैसे घेऊन जुगार लावत असल्याची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळतात सपळा रचून दोन सटेबाजांनी कसून चौकशी केली असता आरोपींची सट्टाबाजारावर जुगार खेळत असलेल्या कबूल केले त्यावरून या दोन्ही आरोपना अटक करण्यात आली. 

घुग्घुस शहरातील बस स्टँड परिसरात जुगार लावणाऱ्या दोन सट्टेबाजांना अटक करण्यात आली या 3 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काणीपा कांबळे व सदाशिव मांढरे असे अटक करण्यात आलेल्या जुगारांची नावे आहेत.

सदर कारवाई घुग्घुस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोऊनी गौरीशंकर आमटे, महेंद्र बुजाडे, रणजीत भुरसे, नितीन मराठे, सचिन वासाडे आदींनी केली आहे.




Post a Comment

0 Comments