विवाहित प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जळण्याचे प्रयत्न; स्वतः घेतला गळफास

 



 विवाहित प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जळण्याचे प्रयत्न; स्वतः घेतला गळफास

चंद्रपूर( राज्य रिपोर्ट ) :  विवाहित महिलेशी असलेल्या प्रेम प्रकरणामुळे प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला तर स्वतः घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 24 एप्रिल सोमवार रोजी दुपारी 2 : 00  वाजताच्या सुमारास मूल शहरात घडली. बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय 45 वर्ष रा. वार्ड क्रमांक. 11 मूल असे विवाहित प्रियकाराचे नाव आहे.

एका विवाहित असलेल्या महिलेशी मृतकाचे बऱ्याच वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे मृत्याच्या घरी नवरा बायको मध्ये नेहमी भांडणे व्हायचे.  यांच्या प्रेमसंबंधाची नेहमीच चर्चा व्हायची.

बंडू निमगडे विवाहित असून त्याला एक मुलगा आहे, त्याचे तेथीलच एका महिलेशी बऱ्याच दिवसापासून विवाहबाह्य संबंध होते त्या महिलेलाही एक मुलगा आहे. यांचे प्रेम प्रकरण जगजाहीर झाल्याने बंडू निमगडे च्या घरात नेहमीच वादविवाद व्हायचे याला कंटाळून रागाच्या भरात बंडू ने प्रेयसी महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तीला जळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वतःचा घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेला पोलिसांनी मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 घटनेचा गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली. पेट्रोल टाकून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मृतक  बंडू उर्फ रामचंद्र निमगडे विरुद्ध 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आत्महत्या प्रकरणी मार्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार बनसोड करीत आहेत.




Post a Comment

0 Comments