संसद भवन व महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

 



संसद भवन व महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

◾राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व अन्य मान्यवरांनी उपस्थित



चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती पर्वावर केंद्रीय समाजकल्याण मंत्रालय नवी दिल्ली द्वारा संसद भवन परीसरातील पुतळ्याला अभिवादन करुन भावपूर्ण आदरांजली वाहिण्यात आली. 


दि. 14 एप्रिल 2023 रोजी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या अभिवादन समारोहास पूर्व राष्ट्रपती मान. रामनाथ कोविंद जी, उपराष्ट्रपती जगदिश धनकड जी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतिस अभिवादन केले.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदन येथील पुतळ्यास तसेच भाजपा राष्ट्रीय कार्यालयात सुध्दा डॉ. बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांनी राष्ट्रीय व सामाजिक उत्थानासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करुन त्यांच्या वैचारीक क्रांतीतून सर्वांनी राष्ट्रीय विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.



Post a Comment

0 Comments