दारू भट्टीतून चोरी गेलेली 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, एक पेटी देशी दारूची पेटी हस्तगत



दारू भट्टीतून चोरी गेलेली 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, एक पेटी देशी दारूची पेटी हस्तगत

◾स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर कार्यवाही 

चंद्रपूर( राज्य रिपोर्टर ) :  16 एप्रिल ते 17 एप्रिल रोजी चे रात्रो दरम्यान मूल तालुक्यातील भेजगाव येथील अखिल गंगारेड्डीवार यांचे मालकीचे दारू भट्टीतून 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, एक पेटी देशी दारूची पेटी तसेच काउंटर मध्ये ठेवलेली नगदी 2700 रु व देवघरातील नगदी 1500 रुपये असा एकूण 84, 395/- रुपये चा मुद्देमाल चोरी झाल्याचे व पोलीस स्टेशन मुल येते अपराध क्रमांक. 147/23 कलम 461, 380 भांदवी चा गुन्हे नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा चंद्रपूर हे समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चंद्रपूर शहर बंगाली कॅम्प परिसरात राजीव गांधी नगर चंद्रपूर येथे राहणारे राकेश महतो यांचे घरी चोरीची दारू लपवून ठेवली आहे. 

अशा माहितीवरून राकेश महतो रा. राजीव गांधी नगर चंद्रपूर याचे घरी पाहणी केली असता राकेश मारतो हा पोलिसांना पाहून मोटरसायकलने पडून गेला त्यांची पत्नी पूजा महतो वा पंच्यासमक्ष झडती घेतली असता बाथरूम मध्ये लपवून ठेवलेला चोरीचा मुद्देमाल बियरचे 18 बॉक्स एकूण 54,000  रुपये चा मुद्देमाल पंच्यासमक्ष  जप्त केला. तसेच सदर दारू ही राकेश महंतो, विनोद उर्फ विक्की महतो व ईतर एक अनोळखी इसमाने आणून ठेवल्याचे पूजा महतो सांगितले. पोलीस स्टेशन मुल अप. क्रमांक. 147/23 कलम 461, 380 भांदवीचा गुन्हा नमूद आरोपीकडून उघडकीस करण्यात आला. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, यांचे मार्ग मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, पो.हवा. नितीन साळवे, पो. हवा. प्रकाश बलकी व पो. अ. मिलिंद जांभुळे, सतीश बगमारे, मपोअं.अर्पणा मानकर व चानापोकां. दिनेश उराडे यांनी केली.



Post a Comment

0 Comments