नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-2 संवर्गाच्या ग्रेड-पे वाढीसाठी 3 एप्रिल,2023 पासून कामबंद आंदोलन.

 





नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-2 संवर्गाच्या ग्रेड-पे वाढीसाठी 3  एप्रिल,2023 पासून  कामबंद आंदोलन.

◾राज्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार कामबंद आंदोलन


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : महसूल प्रशासनातील तहसीलदार व नायब तहसीलदार हे महत्वाचे घटक असून महसूल विभागाच्या कामा व्यतिरिक्त राज्य शासनाच्या इतर विभागाची कामे, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, कायदा व सुव्यवस्था स्थापित करण्यासाठी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कर्तव्याची कामे करणे याकरीता राज्य शासनाने नायब तहसीलदार यांना  राजपत्रित वर्ग -2 हा दर्जा दिला आहे, परंतु वेतन श्रेणी मात्र वर्ग-3 ची अमलात आहे. 

वेतन श्रेणी मधील असमानता दूर करण्यासाठी शासनाकडे सन 1998 पासून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु अद्यापही न्याय मिळाला नाही. 

बक्षी समितीने सुद्धा नायब तहसीलदार यांचे न्याय मागणी प्रलंबीत ठेवल्याने याबाबत राज्य शासनाकडे वारंवार विनंती करुन सुद्धा निर्णय घेण्यात आला नसल्याने अखेर दि. 3 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदार कामबंद आंदोलन करणार असून बल्लारपूर तालुक्यातील सर्व श्री.सतीश साळवे, महेंद्र फुलझेले, राजेंद्र शेंडे, श्री.चंद्रशेखर तेलंग नायब तहसीलदार, अनिलकुमार जांभुलकर  नायब तहसीलदार यांनी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याबाबत निवेदन स्नेहल रहाटे प्रभारी उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांच्याकडे  निवेदन सादर केले आहे.



Post a Comment

0 Comments