अभाविप वरोरा व लोकमान्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

 






अभाविप वरोरा व लोकमान्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

वरोरा ( राज्य रिपोर्टर )  : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शाखा- वरोरा, राष्ट्रीय सेवा योजना लोकमान्य महाविद्यालय वरोरा  आणि लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 मार्च 2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या सुरुवातीला उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुबोध कुमार सिंह यांनी 'मानवी जीवनातील रक्तदानाचे महत्त्व' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोराचे सन्माननीय पदाधिकारी श्री गणेश  नक्षीने यांनी या रक्तदान शिबिराला आपल्या शुभेच्छा दिल्या. तसेच लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या अपर्णा सागरे  मॅडम यांनी 'रक्तदानाची आवश्यकता काळाची गरज' याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 

या रक्तदान शिबिरात एकूण 30 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. रक्तदात्यांचा  उत्साह वाढावा यासाठी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वरोरा द्वारा प्रत्येकी रक्तदात्यांना सन्मानचिन्ह  देण्यात आले. या शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य सुबोध कुमार सिंह रासोयो कार्यक्रमाधिकारी डॉ. तानाजी माने आणि रासोयो सह कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शेंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर या या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अभाविप वरोरा शाखेचे  गणेश नक्षीने, शकिल शेख, मोनिका टिपले,सोनाक्षी हरबडे, रोहित चामाटे, समर्थ कुमरे, अथर्व गवळी, अंकित सोनेकर, लोकेश रूयारकर, गणेश चांभारे,  अमृता आंबुलकर, सुहानी जांभुळकर ,नंदनी पोटे, आधी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले व अथक परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments