आमदार किशोर जोरगेवार यांनी सह कुटुंब घेतले माता महाकालीचे दर्शन





आमदार किशोर जोरगेवार यांनी सह कुटुंब घेतले माता महाकालीचे दर्शन


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  चैत्र महिण्यातील माता महाकाली यात्रेला काल पासून सुरवात झाली आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सह कुटुंब माता महाकालीचे दर्शन घेत यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण कर चंद्रपूरकरांना सुदृढ आरोग्य दे अशी मनोकामना केली. यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, प्रसाद किशोर जोरगेवार, रंजिता जोरगेवार, माता महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनिल महाकाले यांची उपस्थिती होती.       

  चैत्र महिण्यात सुरु होणा-या माता महाकाली यात्रेला सुरवात झाली आहे. भाविक मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल व्हायला सुरवात झाली आहे. या भाविकांची योग्य व्यवस्था करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत त्यांनी प्रशासन आणी माता महाकाली भक्तांची बैठक घेत येथील उपययोजनांची माहिती घेतली होती. यावेळी आवश्यक त्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.

       दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकुटुंबीय माता महाकालीचे दर्शन घेतले. यावेळी यात्रेसाठी आलेल्या भाविकांचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेत येथील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच यावेळी माता महाकालीची पूजा करत चंद्रपूरकरांच्या सुदृढ आरोग्याची प्रार्थना केली.



Post a Comment

0 Comments