कोण जिंकणार बेला सोसायटी ?

 


कोण जिंकणार बेला सोसायटी ?

◾मतदारांमध्ये उत्सुकता, प्रचार शिगेला

 बेला ( राज्य रिपोर्टर ) विनोद कुमार डांगरे :  येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक 1 एप्रिलला होत आहे. दुरंगी लढतीत कोण बाजी मारेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीसाठी लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी मतदान होणार आहे.

   गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये बेला येथील सेवा सहकारी संस्थेवर अबाधित एक हाती सत्ता ठेवणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर भोयर यांनी आपले शेतकरी सहकार पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यांना शह देण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच अरुण बालपांडे यांनी आपले जनसामान्य सहकार पॅनल पहिल्यांदाच लढतीत उतरवले आहे. निवडणुकीला केवळ 3-4 दिवस शिल्लक असल्याने प्रचाराची रंगत शिगेला पोहचली आहे.

भोयर यांच्या शेतकरी सहकार पॅनल कडून सर्वसाधारण कर्जदार गटातून महादेव आमनेरकर ,स्वतः ज्ञानेश्वर भोयर, रमेश परसराम भोयर, ज्योती कुमार देशमुख ,नारायण गवळी, चांगदेव खडसे, रमेश रोडे व विष्णू सोयाम तर महिला राखीव गटातून विजया फुलचंद उगेमुगे व मीना नामदेव उमाटे भटक्या विमुक्त जाती जमाती मधून दिलीप जनार्दन झिले,अनुसूचित जाती-जमाती मधून माजी अध्यक्ष वासुदेव कांबळे व इतर मागास प्रवर्गातून  बबलू तिमांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 त्यांचे विरोधात बालपांडे यांच्याकडून सर्वसाधारण कर्जदार गटात रमेश चुटे , ओमप्रकाश डेकाटे , गुलाब गलांडे , सुरज कांबळे, एकनाथ कावळे, संतोष देवाजी रोडे, तुकाराम शिंगारे , चंद्रभान उरकुडे इतर मागासवर्गीय गटातून संजय तीमांडे.

महिला राखीव गटातून ज्योती बाबाराव आमनेरकर व अल्का भाऊराव तळवेकर भटक्या विमुक्त जाती जमाती मधून संजय मंदे तर अनुसूचित जाती जमाती मधून संजय बाळाजी पुरके असे उमेदवार  आहेत. एकास एक लढतीत कोण विजयी होईल याची गावात सर्वत् उत्सुकता  लागली आहे.

 सेवा सहकारी सोसायटीच्या या निवडणुकीत 556 मतदार आहे त्यापैकी काही मृत झाले तर काही शेतकऱ्यांचे मतदार यादी मध्ये नाव नाही. प्रथमच काँग्रेस आणि बीजेपी विचारसरणीचे नेते एकत्र निवडणूक लढवत असून , जनतेच्या गळ्यातील ताईत असलेले अरुण बालपांडे यांना हरविण्यासाठी एकत्र आल्याचे  दिसते.



Post a Comment

0 Comments