महेश अहीर यांच्या पार्थिवावर साश्रुनयनांनी अंतिम संस्कार

 



महेश अहीर यांच्या पार्थिवावर साश्रुनयनांनी अंतिम संस्कार 

◾ज्येष्ठ बंधु चंदन अहीर यांनी दिला पार्थिवास मुखाग्नी



चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे  ज्येष्ठ बंधु हरीश्चंद्र अहीर यांचे चिरंजीव महेश अहीर(वय 25 वर्षे) यांचे पार्थिवावर दि. 24 मार्च 2023 रोजी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश अहीर यांच्या अकाली, अल्पायुष्यात झालेल्या दुर्देवी मृत्यूमुळे सर्वांच्या मनाला प्रचंड वेदना होतांना जाणवल्या. मृत्यूची बातमी कळताच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक धुरीणांनी हरिश्चंद्र अहीर, हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचे दुःखात सहभागी होताना दिसले.

दि. 24 मार्च संध्याकाळी 07:30 वा हरिश्चंद्र अहीर यांचे निवासस्थानाहून निघालेल्या या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील नागरीक सहभागी होत महेशला अंतिम निरोप दिला. स्व महेश यांचे ज्येष्ठ बंधु चंदन अहीर यांनी आपल्या लाडक्या भावास जिताग्नी दिला.

यावेळी ज्येष्ठ विधितज्ञ रविंद्रजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत अहीर कुटुंबियांवर अवघ्या 2 महिण्यात झालेले आघात मन विदिर्ण करणारे असून त्यांना या संकटातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो अशी प्रार्थना करण्यात आली़ दिवंगत आत्म्यास शांती लाभो यासाठी उपस्थितांनी श्रध्दांजली वाहिली. या अंत्ययात्रेस चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील अहीर कुटुंबियांचे स्नेही, आप्तेष्ट व भाजप परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments