ग्रामपंचायत बेला व एकता नाट्य सांस्कृतिक मंडळाचे स्वच्छता अभियान

 



ग्रामपंचायत बेला व एकता नाट्य सांस्कृतिक मंडळाचे स्वच्छता अभियान

 बेला ( राज्य रिपोर्टर )विनोद कुमार डांगरे  : ग्रामपंचायत बेला व एकता नाट्य व सांस्कृतिक मंडळच्या वतीने बेला नगरीतील ग्रामपंचायत कार्यालय ते चेतना  चिंतामणी मंदिरापर्यंत मुख्य रस्ता   स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली.  

गरिबी, शिक्षणाचा अभाव, स्वच्छतेचा  आणि इतर सामाजिक , बेरोजगारी समस्यांमुळे बेला अजूनही विकसनशील झाला नाही बेला गावाच्या विकासात आणि प्रगतीत अडथळा आणणारी सर्व कारणे बेला गावातून नष्ट करण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत व एकता नाट्य सांस्कृतिक मंडळ, बेला च्या वतीने  स्वच्छता मोहीम ही बेला गावातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी तसेच नागरिकांच्या वैयक्तिक वाढीबरोबरच बेल्याच्या विकासाला चालना देणारी सर्वोत्तम सुरुवात आहे. स्वच्छता मिशनच्या यशामुळेच बेला गावात मोठा बदल होऊ लागला आहे .

बेला गावामधे राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या अंतर्गत आणि बाह्य वाढ आणि विकासाशी निगडीत आहे, जे “स्वच्छ, आनंदी आणि निरोगी नागरिक आणि विकसित बेल्याचा निर्मितीमध्ये सहभागी होतात” या घोषणेच्या संपूर्णतेमध्ये प्रतिबिंबित होते. स्वच्छ भारत अभियान किंवा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात आज बेला ग्रामपंचायत मधून करण्यात आली वार्ड क्र.१ मधील मुख्य रस्ता पर्यंत रोड ची स्वच्छता करण्यात आली या उपक्रमामध्ये  सरपंच अरुण  बालपांडे, उपसरपंच प्रशांत  लांबट, ग्रामपंचायत बेला  सदस्य सुरज कांबळे , सदस्या योगेश  गाते, शालू  लांडे, नीतू आत्राम, कल्पना  पादाडे, हेमलता झगडे, सविता  रोडे, ,नितीन  बालपांडे, संजय  पूरके , शिलाताई गंधारे, सुनील गावंडे, संजय मंदे, ज्योती आमनेरकर, अल्का तळवेकर, संजय  तिमांडे, रमेश चुटे , ओमप्रकाश  डेकाटे, गुलाब गलाडे, एकनाथ कावळे, संतोष रोडे, सतिश  मुंजे, तुकाराम शिंगारे, चंद्रभान उरकुडे आदी जनतेनी सहभाग घेतला होता तसेच एकता नाट्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद कुमार डांगरे, कार्याध्यक्ष दिनेश गोळघाटे, उपाध्यक्ष श्री. सुनील गावंडे, कोषाध्यक्ष श्री. किशोर बानकर, सचिव अशोकजी नकले  व बेला गावातील मंडळी,   तुकारामजी शिंगारे, गुलाबरावजी गलांडे, मते काकाजी, किशोर सोणकुसरे, गंगाधरजी मते, महेश गाते, पांडुरंग साठोने,किशोर आत्राम, कमलाकर वाघाडे,  कौशल बालपांडे,अनुरूप धांडे, उमाटे गुरुजी, अरुण कावळे, नामदेव लांमपुसे, खातखेडे सर, संजय मंदे,दशरथ झगडे,सुधीर नीमजे, योगेश काजवे,ग्रामपंचायत कर्मचारी, शेखर फुलपाटील, विजय चुटे,राम वर्मा,अभी राणे, किरण राणे, रगडे बाई, विक्की ढेकन, महेश गोहने, किशोर शिर्शिकर, पंढरी मुळे,मोहन तीमांडे, राजू हिंगे,सरिता रगडे, किरण राणे, उमा राणे,तसेच स्वच्छ्ता कामगार व इतर नागरिकांनी प्रत्यक्ष अप्रत्येक्षपणे सहकार्य केले त्याबद्दल ग्रामपंचायत बेला तसेच एकता नाट्य व सांस्कृतिक मंडळाने कार्यकर्त्याचे आभार व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments