शिंगोरीचे नदीपात्रात हरिनाम सप्ताह;भागवत कथा प्रारंभ रविवारी थाटात सांगता

 



शिंगोरीचे नदीपात्रात हरिनाम सप्ताह;भागवत कथा प्रारंभ रविवारी थाटात सांगता   

बेला ( राज्य रिपोर्टर ) विनोद कुमार डांगरे : उत्तरवाहिनी नांद नदीपात्रात शिंगोरी वाशीयांनी यंदाही अखंड हरिनाम सप्ताह सुरु केला आहे. त्यामध्ये ह भ प रुपेश महाराज तळवेकर यांचे संगीतमय भागवत प्रवचनाचा असंख्य भक्तगण लाभ घेत आहेत. पहाटे काकडा व गाथा भजन नंतर पारायण, सायंकाळी व रात्रीला किर्तन व जनजागरण येथे नित्यनेमाने सुरू झाले आहे. यानिमित्ताने गावात प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण पहायला मिळते.    सोमवारला परभणीचे संदीप धानोरकर यांचे कीर्तन पार पडले. बुधवार 15 मार्चला हभप किशोर ठाकरे गुरुवार 16 ला अमरावतीचे हभप पंकज पोहकर, 17 ला ह भ प संजय शिंदे ,18 ला गणेश शिंदे यांचे भारुडी कीर्तन तर रविवारी 19 मार्चला भागवताचार्य तळवेकर महाराज गोपालकाल्यांचे किर्तन करतील. त्यानंतर लगेच भव्य महाप्रसाद काला होईल. याचा पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.    अभंगस्नान, पूजा, अर्चना, अखंड विनावादन व अखंड दीपप्रज्वलन करून कलश स्थापना करण्यात आली. शनिवारी 18 मार्चला अप्रतिम दीप उत्सव व पालखी दिंडी सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. भागवताचार्य रुपेश तळवेकर यांना गायक व वादक धनु मुंडे, लखन उदगीरकर तबलावादक भारत भुरले प्याड वादक संकेत वरघने यांची चांगली साथ संगत मिळतं आहे. हरिनाम सप्ताहात विलास कावळे, नामदेव डुकरे, प्रभाकर भोयर, देविदास लोंढे, लक्ष्मण पिसुडे, दयाराम बकाल, कृष्णाजी पिसुडे ,परसराम डुकरे, मोरेश्वर कावळे, मुकुंदराव अवघडे, किसना बावणे ,हरिचंद्र मडावी, सुनील कावळे, शंकर वडतकर, नरेश ,विठ्ठल ,महादेव डुकरे विविध महाराज, कलावंत, सक्रिय कार्यकर्ते व भक्तांना भोजनदान देत आहे.



Post a Comment

0 Comments