सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते कला शाखेतील योगदानासाठी प्रा. जी. एस. माजगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

 











सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते कला शाखेतील योगदानासाठी प्रा. जी. एस. माजगांवकर  यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

◾पु. ल. देशपांडे कला अकादमी येथेही येणाऱ्या काळात कला प्रदर्शन भरविले जाणार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


मुंबई ( राज्य रिपोर्टर ) :  राज्यातील कलाकराना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, हक्काचे व्यासपीठ असावे यासाठी येणाऱ्या काळात पु. ल. देशपांडे कला अकादमी येथेही कला प्रदर्शन भरविले जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 131 व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, नरेंद्र विचारे, विक्रांत मांजरेकर तसेच जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा. जी. एस. माजगांवकर, रामदास फुटाणे, चंद्रजीत यादव, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हस्ते कला शाखेतील योगदानासाठी प्रा. जी. एस. माजगांवकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एकाद्या कलाकाराला आपली कला जहांगीर आर्ट गॅलरी येथे सादर करण्याची संधी मिळावी असे नेहमीच वाटत असते, परंतु या आर्ट गॅलरीमध्ये कला सादर करताना अनेकदा काही वर्षे थांबावे लागते. अशा वेळी कलाकाराचे मनोबल वाढण्यासाठी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल. पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे कलाप्रदर्शन भरल्यानंतर त्याची स्क्रीनिंग जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात येईल. 

एकाद्या कलाकारासाठी कलेमध्ये आशय, भावना, भाव निर्माण करणे गरजेचे असते. आज महाराष्ट्रातील अनेक कलाकार कला, साहित्य, चित्रकला, संस्कृती यामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. महाराष्ट्रातील या कलाकारानं हक्काचे व्यासपीठ सांस्कृतिक कार्य विभाग उबलब्ध करुन देण्यात येणार आहे जेणेकरुन आपले कलाकार आपली कला सादर करताना, सादरीकरण करताना कुठेही कमी पडणार नाही असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. 

बॉम्बे आर्ट सोसायटी गेल्या तीन शतकापासून कलेची सेवा करत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोसायटीचे वांद्रे येथील कार्यालयाचे उद्घाटन करताना सांगितले होते, पण मला असे वाटते आर्ट सोसायटी दोन सहस्त्रचंद्रकांत काम करत असून सोसायटीने हे काम असेच सुरु ठेवावे अशी अपेक्षा श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

सहजता, कल्पकता आणि सूचकता या गोष्टी कलाकारांनी अवगत करणे महत्त्वाचे सत्कार स्वीकारल्यानंतर मार्गदर्शन करताना माजगावकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले चित्र आज स्वीकारले गेले नाही म्हणून खर्चून न जाता पुढे जात राहणं आवश्यक आहे. काही कळत नाही हे जेव्हा कळते तेव्हाच  आपल्याला सगळे कळण्यास सुरुवात होते आणि  तेव्हा आपण पुढे जात आहोत असे आपण समजले पाहिजे. आकार, सौंदर्य, प्राविण्य,कलात्मक दृष्टिकोन यामुळेच आपलं कलेमधलं कलामूल्य वाढत असतं. सहजता, कल्पकता आणि सूचकता या तीन गोष्टी कलाकारांनी आपल्यामध्ये अवगत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आजच्या कार्यक्रमादरम्यान एकूण ४८ पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आजपासून जहांगीर आर्ट गॅलरी येथे 131 वे अखिल भारतीय कला प्रदर्शन भरविण्यात आलेजआहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या चारही दालनांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून भारतभरातून आलेलया चित्राकृती, शिल्पाकृती, मुद्राचित्रे, छायाचित्रे  अशा विविध कलाप्रकारांमधील कलाकृती असणार आहेत.

महाराष्ट्रात 134 वर्षे जुनी बॉम्बे आर्ट सोसायटी असून ही सोसायटी सातत्याने कलाविषयक उपक्रम राबवते याचा आनंद आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने वांद्रे येथे दिलेल्या जमिनीवर बॉम्बे आर्ट सोसायटीने बनविलेल्या भव्यसंकुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये केले होते.



Post a Comment

0 Comments