लवकरात लवकर काढा ई-गोल्ड कार्ड अन्यथा मिळणार नाही ५ लक्ष रुपयांचा मोफत विमा
◾७२,३९४ पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ २६५१६ नागरीकांनी घेतला लाभ
या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर मोफत सेवा रुग्णास देण्यात येत आहे. योजनेंतर्गत कॅन्सर,हृदय रोग शस्त्रक्रिया (एन्जिओप्लास्टी,ओपन हार्ट सर्जरी), सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (हिप आणि knee ज्यॉइंट रिप्लासिमेंट), मेंदू शस्त्रक्रिया, मूत्रविकार व त्यावरील शस्त्रक्रिया इत्यादी आजारांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणना-२०११ यादी अनुसार लाभार्थी नागरिकांची निवड ही करण्यात आलेली आहे.
या यादी नुसार चंद्रपूर शहर विभागात एकूण १६,५२७ लाभार्थी कुटुंबांचा समावेश असून ७२,३९४ नागरीक या योजनेचे पात्र लाभार्थी असून आत्तापर्यंत एकूण २६,५१६ लोकांना आयुष्मान कार्ड चे वितरण करण्यात आलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थाजवळ ‘आयुष्मान कार्ड’ असणे गरजेचे आहे. आयुष्मान कार्ड काढण्याकरीता पात्र लाभार्थी नागरीकांजवळ आधार कार्ड, राशन कार्ड किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पत्र असणे आवश्यक असून नजीकच्या सी.एस.सी.केंद्र/आपले सरकार केंद्र किंवा जिल्हातील योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये हे कार्ड मोफत बनवून मिळत आहे. चंद्रपूर शहर येथे योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालय सामान्य रुग्णालय,छोटा बाजार, मुसळे रुग्णालय,मानवतकर रुग्णालय,क्रिस्त रुग्णालय, गाडेगोणे रुग्णालय, डॉ.अजय वासाडे रुग्णालय येथे आयुष्मान कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे.
0 Comments