संरक्षण क्षेत्रासह अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थ संकल्प - डॉ.मंगेश गुलवाडे जिल्हाध्यक्ष भाजपा
चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केलेला 2023-24 या वित्तीय वर्षातील अर्थसंकल्प संरक्षण क्षेत्रासह देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, बेरोजगार, कामगार, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, करदाते, महिला सशक्तीकरण,युवक,युवती,अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग व संपुर्ण घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.मागील वर्षी एकूण बजेट 525 लाख कोटी चा अर्थसंकल्प होता तो आता 594 लाख कोटीचा झाला कॅपिटल बजेट ( भांडवली तरतूद ) 152 लाख कोटींची तरतूद होती यावर्षी 165 लाख कोटीची तरतूद आहे. 12 ते 13% ही वाढ आहे. या अर्थसंकल्पात देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्टार्टअपसाठी पण तरतूद असल्याने आधुनिकीकरणाचा वेग वाढणार आहे. महागाईच्या तुलनेत झालेली वाढ पुरेशी आहे.जगात आर्थिक मंदी असताना आपली अर्थव्यवस्था 6.8% वाढत आहे. यासाठी सरकारचे कौतुक केले पाहिजे.
या अर्थसंकल्पात पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे राष्ट्राभिमुख धोरणे तसेच दुरदृष्टीचा प्रभाव असून या अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मापदंड निर्धारित करुन अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असल्याने देशाची प्रगतीच्या दिशेने भक्कमपणे वाटचाल होणार आहे.
0 Comments