मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
◾आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती, शेकडो नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील क्रिष्णा नगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 वाजता या आरोग्य शिबिराला सुरवात झाली. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराला औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या डाॅ. मेघा कलाम, शल्यचिकीत्सा शास्त्र विभागाचे डाॅ.मुयर बंडावार, डॉ. मृनाल निखारे, स्त्रीरोगशास्त्र विभागाचे भावेश वानखेडे, फिजिशियन डॉ. शितल बोडखे, ह्दयरोग तज्ञ डाॅ. वरघणे, डॉ. राठोड आदींचे सहकार्य लाभले. या शिबिराला यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर मतदार संघाचे आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, बंगाली समाज महिला शहर प्रमूख सविता दंडारे, शहर संघटक विश्वजीत शाहा, सायली येरणे, हेरमन जोसेफ, तापोस डे, आनंद रणशुर, वैशाली मेश्राम, कौसर खान, अल्का मेश्राम, रुपा परसराम, स्मिता दोनाडकर, कविता निखाडे प्रवीण पंचभुते, अनंत राॅय, जय विश्वास, गणेश किनेकर, सिध्दार्थ मेश्राम, परशुराम चव्हाण, एकनाथ मोहितकर, कालु शहा, रुपेश मुक्कावार आदींची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवारी राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरातही आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेहि मुल रोड वरील क्रिष्णा नगर दुर्गा माता मंदिराच्या पटांगणावर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, श्वसन रोग, अस्थी रोग, आदी रोगांवर तपासणी करण्यात आली असून निशुक्ल औषाधोपचार करण्यात आला. या शिबिराचा परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर मतदार संघाच्या विकासाबाबत सकारात्मक आहे. या भागाच्या विकासासाठी मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. पूढेही अनेक कामे त्यांच्या कार्यकाळत केल्या जाणार आहे. मतदार संघातील अनेक विकासकामे प्रस्तावीत असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदर कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणार असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. खरे तर विकासकामे होत राहतीलच पण त्या सोबत आपण आपल्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. आपण मतदार संघातील विविध भागात असे आरोग्य शिबीर आयोजित करत आहोत. नागरिकांनीही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन आयोजित होत असलेल्या या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments