यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर

 






यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी 34.98 कोटी रुपये मंजूर 

 2 हजार 803 लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर 

 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत 34 कोटी 98 लाख 14 हजार 400 रुपये निधी मंजूर झालेला आहे . जिल्ह्यातील मूलपोंभुर्णाबल्लारपूरचंद्रपूर या चार तालुक्यातील 2 हजार 803 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्याचे वनसांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झालेले आहे.

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी याबाबतचे मान्यता व निधी वितरणाबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. मूल तालुक्यातील बेंबाळकेळझरजुनासुर्लाफिस्कुटीगांगलवाडीखालावसपेठचकदूगाळाचितेगावविरईचिरोलीमरेगावआकापूरताडाळादाबगाव मक्तासुशी दाबगावराजगडनवेगाव भुजबाबराळाउथळपेठनलेश्वरमारोडापिपरी दीक्षितचिचाळामुरमाडीबोरचांदलीराजोलीनांदगावगोवर्धनटोलेवाहीचिमढाटेकाडीसिंतळा,येरगावउश्राळाभवराळाचांदापूरजानाळा,मोरवाहीचिखलीकोसंबी,काटवनडोंगरगावभादुर्णीहळदीभेजगावगाडीसुर्ला या गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पोंभुर्णा तालुक्यातून चेक आंबेधानोरादेवाडा खुर्दघाटकुळचक फुटाणाभीमणीबोर्डा बोरकरबोर्डा झुल्लरवारआष्टाचेक आष्टाउमरी पोतदारकसरगट्टाजामतुकूमदेवाडा बुजदिघोरीघनोटी तुकूमथेरगावजामखुर्द या गावांचा समावेश करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातून गिलबिलीआमडीदहेलीकवडजईकिन्हीमानोरालावारीहडस्तीईटोलीविसापूरकळमनापळसगावकोठारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

चंद्रपूर तालुक्यातून चकनिंबाळापायलीआरवटपडोलीमामलाचकवायगावपिपरीवरवटवढाशेनगावमारडाबोर्डायेरूरनागाळापडोलीजुनोनागोंडसावरीचिंच्चपल्लीबेलसनीमहाकुर्लागोंडसावरीचिचाळानकोडाजुनोनामारडा या गावांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून समावेश करण्यात आला आहे. लवकरच घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे.




Post a Comment

0 Comments