जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) Awareness about World AIDS Day at Janata High School ( Depot Branch ) Ballarpur बल्लारपूर येथे जागतिक एड्स दिवसाबाबत जनजागृती

  







जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) Awareness about World AIDS Day at Janata High School ( Depot Branch ) Ballarpur बल्लारपूर येथे जागतिक एड्स दिवसाबाबत जनजागृती



बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर येथे दिनांक 01/12/ 2022 रोजी दुपारी 4 : 00 वाजता जागतिक एड्स दिवसाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. एम. डी. टोंगे ( माजी मुख्याध्यापक ), प्रमुख वक्ता श्री. यु. के. रांगणकर सर ( विज्ञान शिक्षक ) आणि प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम यांची मंचावर उपस्थिती होती.

मंचावर उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.

प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम सर यांनी सांगितले की, एड्स या रोगामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होते. या रोगाचा आतापर्यंत इलाज निघालेला नाही, फक्त काळजी घेणे आवश्यक आहे. एड्स हा रोग ताबडतोब लक्षात येत नाही, काही कालांतराने त्याची लक्षणे जाणवायला लागतात, म्हणून या रोगामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता श्री. यु. के. रांगणकर सर विज्ञान शिक्षक यांनी सांगितले की, एड्स म्हणजे एक्वायर्ड इम्युन डीफीसीएनसी सिंड्रोम चा इतिहास 19 व्या शतकात दक्षिण आफ्रिका येथे प्राण्यांत आढळला. 1920 मध्ये मानवात आढळला. त्यामध्ये त्यांनी कारणे विषद केली. सोबतच उपाययोजना सांगितल्या. त्यांनी सांगितले की, एड्सचा औषधोपचार मोफत मध्ये आहे.

आपले अध्यक्षिय भाषण करतांना श्री. एम. डी. टोंगे सर यांनी सांगितले की, एड्स बाबत माहिती असावी आणि जागरूकता नुसार काळजी घेणे आवश्यक आहे. आपले जीवन निरोगी ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने जगणे महत्त्वाचे आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. के. वानखेडे, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम आणि आभार प्रदर्शन श्री. एस. एम. चव्हाण  यांनी केले.

कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. दिनेश भाले बाबू , श्री. जगदीश कांबळे, श्री. वामन भाऊ बोबडे, श्री. वाल्मीक खोंडे श्री. इंद्रभान अडबाले, श्री. विजय कोंगरे तसेच विद्यार्थी गण उपस्थित होते. जनजागृती कार्यक्रमाच्या शेवटी चॉकलेट वाटप करण्यात आले.




Post a Comment

0 Comments