चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत जबावबंदी आदेश लागू A curfew order was imposed under Section 37 of the Maharashtra Police Act, 1951

 








चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत जबावबंदी आदेश लागू A curfew order was imposed under Section 37 of the Maharashtra Police Act, 1951

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जिल्ह्यात विविध आंदोलन व कार्यक्रमाचे आयोजन प्रसंगी तसेच सण व उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा क्षेत्रात डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 नुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे.

या कालावधीत पूर्व परवानगीशिवाय कोणीही सभामोर्चाउत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणीरस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. कोणतीही व्यक्ती शस्त्रसोटेतलवारीभालेदंडेबंदुकासुरेकाठ्यालाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणेदगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणेजमा करणे किंवा तयार करणेव्यक्तीच्या आकृत्याप्रतिमा यांचे प्रदर्शन करणेजाहीरपणे घोषणा करणेगाणी म्हणणेवाद्य वाजविणेतसेच यामुळे सभ्यता आणि नितिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणेहावभाव करणेचित्रेचिन्हेफलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणेत्यांचे प्रदर्शन करणेत्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर आदेश कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी तसेच लग्न समारंभ व प्रेतयात्रेकरिता लागू राहणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.





Post a Comment

0 Comments