बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील भिवकुंड नाल्या जवळील हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञाताकडुन विटंबना, परिसरात तणाव, पोलिस घटनास्थळी दाखल Unknown vandalism of idol in Hanuman temple near Bhivkund drain on Ballarpur-Chandrapur road, tension in the area, police rushed to the spot

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर विसापूर लगत भिवकुंड नाला परिसरात मागील अनेक वर्षांपासून हनुमान मंदिर स्थापित आहे नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून हा राज्य महामार्ग असल्यामुळं सतत या रस्त्यावर वर्दळ सुरु असते तरी सुध्दा आज गुरुवार दि.२४/११/२०२२ ला सकाळच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींना या मंदिरातील हनुमानजींच्या मूर्तीची विटम्बना करण्यात आल्याचं लक्षात आले. (Bhivkund Nala, Hanuman Mandir)

 अज्ञात व्यक्तीने केवळ मूर्तीची विटम्बना केली नव्हे तर मूर्ती ही खंडित केली असल्याचं चित्र दिसत होते सदर घटना ही रात्रीच्या सुमारास घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेची नागरिकांना माहीती होताच  चंद्रपुर, बल्लारपूर व विसापूर येथील भक्तांनी तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अशा घटनेद्वारे हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालण्याच्या प्रयत्न अज्ञात व्यक्ती कडुन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधित समाज कंटकाला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेची माहीती पोलिसांना प्राप्त होताच बल्लारपूर पोलिस, चंद्रपुर शहर पोलिस व अन्य पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले असून वेळीच परिस्थितीवर नियंत्रण राखले असून संतप्त कार्यकर्त्यांचं ऐकून अज्ञात समाज कंटकास लवकरात लवकर अटक करण्यात येइल  अस आश्वासन प्रशासनाने दिले.

Post a Comment

0 Comments