सिएसटीपीएसच्या राख वाहिनीतील राख गळती थांबविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करा - आ. किशोर जोरगेवार ( Take permanent measures to stop ash leakage in CSTPS ash channel - MLA. Kishor Jorgewar )

 









सिएसटीपीएसच्या राख वाहिनीतील राख गळती थांबविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करा - आ. किशोर जोरगेवार ( Take permanent measures to stop ash leakage in CSTPS ash channel - MLA.  Kishor Jorgewar )


  ◾सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत केल्या सूचना

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सिएटीपीएसच्या राख वाहिनीतुन राखेची गळती होत असल्याने लगतच्या  नागपूर(छोटा), विचोडा, चारगाव, मोरवा, ताडाळी, पडोली येथील शेती प्रभावीत होत असुन शेतक-र्यांचे मोठे नुकसान होत आहे. Agriculture is becoming effective and farmers are suffering huge losses. 

त्यामुळे या गंभिर प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देत राख वाहिनीतील राख गळती थांबविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-र्यांना केल्या आहे. सोबतच पावसाळ्यात छोटा नागपूर आणि विचोडा येथे उद्भवणा-या पुर परिस्थिती बाबतही उपायोजना करण्याच्या सूचना यावेळी आ. जोरगेवार यांनी केल्या आहे. ( The villagers of the village adjacent to the ash canal of CSTPS had taken their complaints to MLA Kishor Jorgewar )

   सिएसटीपीएसच्या राख वाहिनी लगत असलेल्या गावातील गावकर्यांनी आपल्या तक्रारी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे केल्या होत्या. या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर सुचना केल्या आहे. या बैठकीला सिएटीपीएसचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, कार्यकारी अभियंता उरकुडे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी माजी नगर सेवक बलराम डोडाणी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामिण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, छोटा नागपूरचे ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाढई, विचोडा ग्रामपंचायत सदस्य बंडू रामटेके, संजु बोबडे, महादेव पिंपळकर, हरि वसींग, लहु रासेकर आदींची उपस्थिती होती.

मौजा छोटा नागपूर विचोडा, चारगाव, मोरवा, ताडाळी, पडोली येथील शेतकर्यांच्या शेतीलगत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची नवीन राख वाहीणी आहे. सदर राख वाहीणीतुन राख गळती होत असल्याने शेतालगत राखेचा ढीग लागला आहे. या राखेच्या ढिगाऱ्यामुळे शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर जाण्याचा मार्गात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे पाणी शेतातच साचत आहे. तसेच शेतात राख साचल्याने शेतीची सुपीकता कमी होत असून शेतीच्या पिकांवर विपरीत परिणाम होऊन शेतजमीन नापिक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी या गावातील  शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता सदर राख वाहीणीची योग्य दुरुस्ती करून  सुरु असलेली गळती कायमस्वरुपी थांबवावी अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-र्यांना केल्या आहे. तसेच शेतीतील पाणी वहन होण्याकरिता नालीचे बांधकाम करण्यात यावे, सदर गावातील रस्त्यावर नियमीत पाण्याचा छीडकाव करण्यात यावा,  नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी आदी सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहे. या बैठकीला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments