बल्लारशाह रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल Slabs Fall of Of Foot Over Bridge at Balharsha Railway Junction

 







बल्लारशाह रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल Slabs Fall of  Of Foot Over Bridge at Balharsha Railway Junction

पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दि. 27 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी बल्लारशाह रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जवळपास १३ जण जखमी झाल्‍याचे प्रथम दर्शनी कळले. या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्‍णांना चंद्रपूर येथील जिल्‍हा सामान्य  रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. The Guardian Minister ordered the Collector and the Superintendent of Police to investigate

ही बातमी कळताच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत  त् सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी  श्री. विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक श्री. परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्‍लारपूर येथील पदाधिकारी रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचून त्‍यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.




Post a Comment

0 Comments