वरोऱ्यात २ डिसेंबर पासून सहा दिवस रोटरी उत्सव Rotary festival for six days from 2nd December at Varora








 वरोऱ्यात २ डिसेंबर पासून सहा दिवस रोटरी उत्सव Rotary festival for six days from 2nd December at Varora

◾महिला सशक्तीकरणावर दिला जाणार भर

वरोरा ( राज्य रिपोर्टर )  : येथील रोटरी क्लबच्या वतीने सातव्या रोटी उत्सवाचे आयोजन येत्या २ ते ७ डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून पहिल्यांदाच तालुका क्रीडा संकुलवर दोन लाख चौरस फूट जागेवर हा उत्सव होत असून याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.  The festival is being held from December 2 to 7 at the Taluka Sports Complex for the first time in a two lakh square feet space.

यावर्षीचा उत्सवात महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. वरोरा येथील रोटरी क्लबच्या वतीने मागील सात वर्षांपूर्वीपासून प्रतिवर्षी रोटी उत्सवाचे आयोजन केले जाते. मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्ष हा उत्सव होऊ शकला नाही. परिणामी यावर्षी होत असलेल्या या उत्सवाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. येत्या २ ते ७ डिसेंबर दरम्यान तालुका क्रीडा संकुल वर होत असलेला हा उत्सव प्रथमच दोन लाख वर्ग फूट जागेवर होत आहे. या उत्सवात विविध कंपन्यांच्या उत्पादनांची प्रदर्शनी व विक्री असणार आहे. तसेच खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल या उत्सवात राहणार असून मनोरंजनाची ही भरपूर व्यवस्था येथे असणार आहे. सदर उत्सवात महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला जाणार असून या उत्सवातील प्रत्येक दिवशी क्रीडा, कला, साहित्यिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. या उत्सवाला नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे आणि भरपूर आनंद घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग पत्तीवार सचिव अदनान सिद्दीकोट, कोषाध्यक्ष योगेश डोंगरवार नितेश जयस्वाल, होजफा अली,हिरालाल बघेले यांनी पत्रकार परिषदेतुन केले आहे.





Post a Comment

0 Comments