चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत विभिन्न स्पर्धांचे आयोजन Including Painting / Poster Making Competition, Street Drama Competition, Mural Art Competition, Short Movie Competition and Essay Competition







चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत विभिन्न स्पर्धांचे आयोजन Including Painting / Poster Making Competition, Street Drama Competition, Mural Art Competition, Short Movie Competition and Essay Competition


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विभिन्न स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या आहेत. यात जिंगल स्पर्धा, चित्रकला / पोस्टर मेकींग स्पर्धा, पथनाट्य  स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा, शॉर्ट मुव्ही स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचा समावेश आहे. Organized various competitions under Swachh Bharat Abhiyan 2.0 by Chandrapur Municipal Corporation
     स्वच्छ अभियान अंतर्गत समाजाच्या विविध वयोगटातील नागरीकांचा स्वच्छता मोहीमेत सहभाग असावा या दृष्टीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये या स्पर्धेची माहीती देण्यात आली असुन मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग लाभत आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ चंद्रपूर, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक बंदी हे स्पर्धेचे विषय असुन या विषयांवर जिंगल, चित्रकला / पोस्टर मेकींग, पथनाट्य, म्युरल आर्ट,निबंध, शॉर्ट मुव्ही स्पर्धकांना तयार करावयाचे आहेत.
      स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकास स्पर्धेतील विषयानुसार कलाकृती तयार करून त्याचे व्हिडिओ अथवा फोटो  infocspcreations@gmail.com या ई मेल आयडी वर २८ नोव्हेंबर पर्यंत पाठवायचे आहेत. प्रत्येक स्पर्धेस विशेष बक्षिसे असुन यात प्रथम बक्षीस  रुपये ५०००/-, द्वितीय रुपये  ३०००/- तर तृतीय बक्षीस रुपये २०००/-  असणार आहे. अधिक माहीतीसाठी ८३२९१६९७४३,७२४८९४४५६७ या क्रमांकावर तसेच मनपा स्वच्छता विभागात संपर्क साधता येईल. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  




Post a Comment

0 Comments