एकोणा कोयला खदान संघर्ष समितीमार्फत कोयला खदान विरोधातील आंदोलन In protest of Western Coal Field Limited, the project victim shaved his head! WCL under Majri Kshetra.

 






 

एकोणा कोयला खदान संघर्ष समितीमार्फत कोयला खदान विरोधातील आंदोलन In protest of Western Coal Field Limited, the project victim shaved his head! WCL under Majri Kshetra.

◾वेकोकीचे मॅनेजर यांनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन

◾तीन दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास  साखळी आमरण उपोषण आंदोलनचा इशारा !  If the demands are not met in three days, a warning of chain hunger strike!

      चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) :  एकोना खदान  मधील परिसरातील नागरिकांना एकोना खदान मुळे मानसिक,शारीरिक तसेच  अनेक समस्‍याचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत कंपनीने कुठल्याही सुविधा दिलेल्या नसून कंपनीत होत असलेल्या  या गावातील अनेक गावाचे पुनर्वसन करण्यात यावे.  माढेळी ते वरोरा व नागरी ते माढेळी रोडची दुरुस्ती करून द्यावी, ॲम्बुलन्स, अग्निशामक, गावात जाणारे सिमेंट काँग्रेसचे रोड, स्ट्रीट लाईट, बेरोजगारांना नोकरीच्या संध्या उपलब्ध करून द्याव्या, सी एस आर फंड निधी अंतर्गत गावाचा विकास करण्यात आला नाही. Ekona Open Pit Coal Mine was started in the year 2016 by Western Coal Field Limited Company under Majri Kshetra.

ग्रामपंचायत एकोना  व लगत च्या गावाला खनिज निधी उपलब्ध करून द्यावी. खदान मधी होत असलेल्या विस्फोटाने गावातील घरांना भेगा पडल्या आहेत त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. परिसरात होत असलेल्या प्रदूषणावर कंपनीने नियंत्रण करावे. कंपनीत नियुक्त कार्यरत महालक्ष्मी तथा अरुणोदय कंपनीने स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. या संदर्भाचे कंपनीसोबत अनेक बैठका झाल्या असल्या तरी फक्त आतापर्यंत आश्वासन देऊन वेळ मारू धोरण कंपनीने अवलंबले आहे. या सर्व मागण्या घेऊन कंपनी एकोणा कोयला खदान संघर्ष समितीमार्फत आज आंदोलन सुरू  करण्यात आले. If the demands are not met in three days, a warning of chain hunger strike!

  वरोरा तालुक्यातील माजरी क्षेत्र अंतर्गत असलेल्या वेस्टर्न  कोल फिल्ड लिमिटेड कंपनीतर्फे सन २०१६ ला एकोना खुली कोयला खदान सुरू करण्यात आली. एकोना,वनोजा ,चरूरखडी, मारडा, या गावातील जमिनी कंपनीने भूसंपादित केल्या होत्या. गाववासियांना लालीपाप दाखवून त्यांच्याकडून जमिनी संपादित करून घेतली. कुठल्याही प्रकारच्या कंपनीने त्यांची भरपाई पुरेशी  प्रमाणात पूर्ण केल्या नाही व जनसुनावणी नुसार वचन पाळले गेले  नसल्याने, संबंधित कंपनीच्या त्रासाने त्रासलेल्या गावकऱ्यांनी 24 नोव्हेंबर ला  वरोरा तालुका व मारेगाव तालूका मिळून 27 ग्रामपंचायतच्या सरपंचांनी एकत्र येऊन कंपनीच्या विरोधात जण आंदोलन करण्याचे ठरवले  होते. Protest against Ekona Coal Mine

त्यानुसार एकोना कोयला खदान संघर्ष समिती  अध्यक्ष सरपंच गणेश चवले, जिल्हा बँकेचे  संचालक डॉ.विजय देवतळे, ऍड.अनिल ठाकरे, सुनंदाताई जीवतोडे, अरुणा खंडाळकर, नरेंद्र ठाकरे, सरपंच देवानंद महाजन,खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष साहेबराव ठाकरे व संचालक संचालक बाळू भोयर, सरपंच चंद्रकला वनशिंगे, सरपंच योगिताताई पिंपळशेंडे, सरपंच शालू ताई उताणे, सचिन बुरडकर उपसरपंच, सरपंच मंगलाताई लेवादे, सरपंच निर्मलाताई दडमल, सरपंच जयश्रीताई चौधरी, आणि या परिसरातील नागरिक पत्रकार आंदोलनात सहभागी झाले होते. प्रारंभी महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  हारार्पन करून  प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर उपस्थित प्रकल्पग्रस्त तसेच  सुमारे 25 गावातील काही प्रतिनिधिक स्वरूपातील  काही सरपंचांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ. विजय देवतळे यांनी सुद्धा सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे भाषणातून जाहीर केले ऍड. अनिल ठाकरे यांनी सुद्धा कायदेशीर हक्क मिळविण्यासाठी मी केव्हाही  एकोना  कोळसा  संघर्ष समिती च्या पाठीशी राहणार  असे त्यांनी सांगितले.

   वेकोलीच्या अधिकाऱ्यांना जाहीर  आवाहन करण्यात आले होते की, जोपर्यंत आमची निवेदन स्वीकारून आम्हाला आश्वस्त करणार नाही व मागण्या पूर्ण करणार नाही  तोपर्यंत आम्ही आंदोलन असेच सुरू राहणार असे संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश चवले यांनी जाहीर केले असता सर्व कार्यक्रमानंतर  वेकोली  एरिया मॅनेजर गौतम रॉय व त्यांचे अधिकारी समवेत आंदोलन स्थळी आले व त्यांनी निवेदन स्वीकारले व तीन दिवसाच्या आत आम्ही या मागण्यांवर  निर्णय घेऊ असे जाहीररीत्या  सांगितले मात्र  जोपर्यंत  मागण्या पूर्ण केल्याचे लेखी पत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे समितीने ठरविले.

   जर तीन दिवसाच्या आत निर्णय न झाल्यास किंवा मागण्या पूर्ण न झाल्यास  लगेच आमरण उपोषणाला बसू असे सुद्धा संघर्ष समितीचे सर्व सदस्यांनी व अध्यक्ष गणेश चवले यांनी अधिकाऱ्यांना सांगितले .

    आंदोलनात चरूर,एकोणा, वनोजा,पांझुरणी परिसरातील    विशेष करून  असंख्य महिला  उपस्थित होत्या व आंदोलनात सुमारे हजारो च्या संख्येने  उपस्थिती दर्शवून आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू  आहे.

वेकोलीच्या  निषेधार्थ  प्रकल्पग्रस्ताने केले  मुंडन .

आज संपूर्ण दिवसभर वैकुलीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आले असता एकोना  खदान संघर्ष समितीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले असतात ते निवेदन त्यांनी स्वीकारले परंतु संध्याकाळपर्यंत कोणत्या प्रकारच्या  न्याय मागण्या  मान्य झाल्याचे त्यांनी कळवले नसल्याने अखेर सायंकाळी पाच वाजता सुमारे 50 प्रकल्पग्रस्तांनी मुंडन करून वेकोलीचा निषेध नोंदविला आहे.




Post a Comment

0 Comments