जिवनाचे मोल नको,जिवन हवे Don't value life, want life - शोभाताई फडणवीस

 






जिवनाचे मोल नको,जिवन हवे Don't value life, want life - शोभाताई फडणवीस

◾माजी मंत्री शोभाताई फडणवीस वनविभागावर बरसल्या.

मूल ( राज्य रिपोर्टर ) : संपुणं वनक्षेत्रात   वाघ- मानव संघर्ष विकोपाला जाऊन दररोज वाघ,बिबट हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा  लागत असून आता वनविभागाने गंभीरपणे याची दखल घेतली पाहीजे व वन्यप्राणी वनक्षेत्र सोडून रहिवासी क्षेत्रात अतिक्रमण करणार नाहीत याकरीता दुरगामी उपाययोजना करानी. गोरगरीबांना जिवनाचे मोल नको तर जिवन हवे अशी मागणी माजी मंत्री श्रीमती शोभाताई  फडणवीस यांनी केली आहे.

मूल येथे माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत वातॉहरांनी विचारलेल्या प्रश्नांना  खूले उत्तर देत शंकांचे निरसन केले.

जिल्हयात  दररोज गोर गरीब शेतकरी,शेतमजूरांचा वाघ हल्ल्यात बळी जात आहे. शाशन मरणाऱ्यांच्या कुटूंबियांना 20 लाख रूपये देऊन मोकळे होत आहे. वनविभागाने जिवनाची किंमत लावण्यापेक्षा वाघांचे नियोजन करून जिवन देण्याचे काम करणे अपेक्षीत  असल्याचे माजी मंत्रयांनी  स्पष्ट केले.

वनविभागाने कुठलाही निणंय घेण्याआधी स्थानीक परिस्थितिचा अभयास करायला हवा. दररोज 3 ते 5 या सरसरीने वनक्षेत्रात नागरीक मरत आहेत.भविष्यात वाघ-मानव संघर्ष बाजूला राहील व वनविभाग व नागरीक असा संघर्ष सुरु होईल अशी भितीही माजी मंत्री  फडणवीस यांनी व्यक्त केली.

ताडोबा वनक्षेत्रात  जंगल भ्रमतीसाठी वनविभागाने नवीन 3 प्रवेशद्वार सुरू करण्याची घोषणा अडाणीपणाची असून आता सध्या सुरू असलेल्या 21 प्रवेशद्धारांची संख्या कमी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वाघ-बिबट सरक्षीत क्षेत्र  या प़वेशद्धारामुळे अडचणीत आले असून पर्यतनातुन पैसा कमविण्यापेक्षा पर्यटन व मनोरंजन हाच उद्धेश वनविभागाचा असावा व नाहक महत्वाकांक्षेने जनतेचे जिनव संपविणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पस्ट केले.

ताडोबा बफर व कोअर झोन क्षेत्रात भरमसाठ प़वेशद्धार  सुरू झाल्याने होणारा गोंगाट,गेट जवळील रिसोर्ट मध्ये सुरू झालेली झगमग यामुळें वन्यजीवांचा  नैसर्गीक  अधिवास संपुष्टात  येऊन प़ाणी मानव वसाहतींकडे जात आहेत व मोठा अनर्थ् होत असल्याचे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी  यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप,माजी नगरसेवक महेंद्र करकाडे व कार्यकर्त  उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments