संविधानिक अधिकारासाठी सर्वांनी आग्रही रहावे - हंसराज अहीर Constitution Day celebrated with enthusiasm on behalf of BJP

 







संविधानिक अधिकारासाठी सर्वांनी आग्रही रहावे - हंसराज अहीर Constitution Day celebrated with enthusiasm on behalf of BJP

◾भाजपाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सादर केले होते. या दिवसाचे स्मरण म्हणून आम्ही संविधान दिन साजरा करतो. Prime Minister Hon'ble Narendra Modi had decided to celebrate Constitution Day at the government level across the country from the year 2015.

 प्रधानमंत्री माननिय नरेंद्र मोदी यांनी सन 2015 पासून संपूर्ण देशभरात शासकीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज संपूर्ण देशात  संविधानाप्रती आदर राखून हा दिवस साजरा होत आहे. प्रत्येकाने संविधानाचा सन्मान ठेवतांनाच आपले कर्तव्य,  अधिकार व संविधानाप्रतीची जबाबदारी पार पाडतांनाच प्रत्येक नागरीकांनी सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय व समानता प्रस्थापित करण्यासाठी जागरुक रहावे असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांनी संविधान दिन वर्धापन सोहळ्याच्या शुभेच्छा देतांना केले.

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हा च्या वतीने दि 26 नोव्हेंबर रोजी स्थानिक महानगरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास्थानी जावून या महान विभूतींच्या स्मृतीस अभिवादन करुन संविधान ग्रंथास पुष्प अर्पित केले. यावेळी हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बंधु-भगिनींना भारताच्या संविधान उद्देशिकेची प्रत वितरीत करुन संविधानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास प्रामुख्याने भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत , महानगर जिल्हाध्यक्ष डाॅ मंगेश गुलवाडे, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, रविंद्र गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे, संदिप आवारी, राहुल पावडे, धम्मप्रकाश भस्मे, राजेंद्र खांडेकर, राजू घरोटे, विठ्ठल डुकरे, विनोद शेरकी, वंदना संतोषवार, दिवाकर पुध्दटवार, रवि लोणकर, सविता कांबळे, शितल गुरनुले, जयश्री जुमडे, वंदना जांभुळकर, पुष्पा उराडे, शाम कनकम, शिला चव्हाण, माया उईके, कल्पना बगुलकर, अॅड सारिका संदुरकर, सुर्यकांत कुचनवार,  अॅड सुरेश तालेवार, प्रदिप किरमे, शशीकांत म्हस्के, रेणुका घोडेस्वार, अरुणा चैधरी, मुग्धा खांडे, मोनिषा महातव, शालूताई वासमवार, रुपाली आंबटकर, स्वप्नील मुन, राम हरणे, शाम बोबडे, चंदन पाल, चांद सय्यद, राहुल सुर्यवंशी, पूनम पिसे, राहुल दुधे, राजेश थुल आदिंची उपस्थिती होती.




Post a Comment

0 Comments