बल्लारपूर येथील दुर्घटनेतील जखमींची आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात घेतली भेट MLA Kishor Jorgewar demanded that the railway department take action against the culprits

 








बल्लारपूर येथील दुर्घटनेतील जखमींची आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालयात घेतली भेट MLA Kishor Jorgewar demanded that the railway department take action against the culprits

◾घटनेची चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची केली मागणी

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह रेल्वे स्थानक येथे घेडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची रुग्णालयात जाऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असुन उपचारा दरम्याण सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना केल्या आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

 यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, युवा नेते अमोल शेंडे,  राशेद हुसेन,  रुपेश पांडे , नकुल वासमवार,  हेरमन जोसेफ,  रुपेश कुंदोजवार,  सदनाम सिंग मिरधा, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आरोग्य सेवा पथकाच्या सदस्यांच्या उपस्थिती होती.

  पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना काल बल्लारशाह रेल्वे स्थानकावर घडली. जखमींपैकी ४५ वर्षीय निलीमा रंगारी या महिलेचा मृत्यु झाला आहे. दरम्याण आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर जखमींवर उपचार सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयात जात जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालय प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली आहे. यावेळी जखमींच्या नातलगांशीही आमदार किशोर जोरगेवार यांनी चर्चा करत घटनेबाबत माहिती घेतली आहे.

      सदर पादचारी पुल हा ४० वर्ष जुना होता. त्याची योग्य देखभाल केल्या गेली नाही. सदर पुलाबाबत तक्रारी प्राप्त होऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. ही मोठी चुक असुन याची चौकशी करत दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी रेल्वे विभागाला केली आहे. रेल्वे विभागानेही या प्रकरणाकडे गांर्भियाने लक्ष देत जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी करावी, यासाठी एक पथक रेल्वे विभागाने तयार करावे अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आलेल्या तक्रारींकडे दूर्लक्ष करु नका अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.




Post a Comment

0 Comments