माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजयुमो तर्फे वरोरा येथे मॅरेथॉन स्पर्धा व रुग्णांना फळ वाटप

 









माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजयुमो तर्फे वरोरा येथे मॅरेथॉन स्पर्धा व रुग्णांना फळ वाटप



वरोरा ( राज्य रिपोर्टर ) : राष्ट्रीय ख्यातीप्राप्त नेते माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. हंसराज अहीर यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधत दि. ११ नोव्हेंबर रोजी वरोरा येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने "भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते. 

          क्रीडा क्षेत्रात अनन्यसाधारण योगदान ठेवणारे हंसराज अहिरांनी अनेक खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी भाजयुमोने हि स्पर्धा आयोजित केली होती. 

          सदर कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, बाबाभाऊ भागडे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,  भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, भाजयुमो चे प्रदेश सचिव करण देवतळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहर अध्यक्ष सुरेश महाजन, ओम मांडवकर, माजी जी.प. सभापती राजू गायकवाड,  नरेंद्र जीवतोडे,  शिष ठाकरे, देविदास ताजने, मंगेश भोयर, आकाश वानखेडे, 

         जन्मदिवसानिमित्त येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व हंसराज अहीर यांचेवर स्नेह करणारे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments