दीपक पेंदाम यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाचा धनादेश सुपूर्द

 





दीपक पेंदाम यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाचा धनादेश सुपूर्द

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी महावितरणचे लाईनमन दीपक पेंदाम हे चेकहत्तीबोडी येथे काम करीत असताना त्यांचा अपघात झाला. या अपघाती मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीतून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच लक्ष रुपयाचे अर्थसहाय्य तात्काळ मंजूर करून आणले. या रकमेचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते दीपक पेंदाम यांच्या कुटुंबीयाकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच दीपक पेंदाम यांना दोन छोट्या मुली असल्यामुळे विशेष बाब म्हणून 1200 रुपये महिना अनुदान तात्काळ सुरू करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी सावली तहसीलदारांना दिल्या. एवढेच नाही तर महावितरणकडून अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत काही नियोजन करता येईल, का त्याचाही विचार करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.





Post a Comment

0 Comments