रात्रीच्यावेळी कुणी रस्त्यावर झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू









रात्रीच्यावेळी कुणी रस्त्यावर  झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू

 ◾बेघरांनी घ्यावा रात्र निवाऱ्याचा लाभ


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : सध्या हिवाळ्यामुळे थंडी वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी  बेघर निवारा केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका व देवांशी वस्ती स्तर संस्थेद्वारे करण्यात येत आहे.
      हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी नागरी भागातील बेघरांना निवारा सुरू करण्यात आलेले आहेत. रात्रीच्यावेळी कुणी रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली, रेल्वेस्टेशन, बसस्थानकात झोपू नये यासाठी महापालिकेने बेघर निवारा केंद्र सुरू केले आहेत. शहरातील फिरत्या बेघर महिला व पुरुषांसाठी महानगरपालिका व देवांशी वस्ती स्तर संस्थेने सदर काम हाती घेतले आहे. बेघर निवारा केंद्र उर्दू प्राथमिक शाळा.कस्तुरबा रोड,आझाद बगीचा जवळ.सुरू करण्यात आलेले आहे. सदर केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






Post a Comment

0 Comments