प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने वृध्द, निराधार व रुग्णांना फराळ वाटप

 





प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने वृध्द, निराधार व रुग्णांना फराळ वाटप

 पुणे,पिंपरी चिंचवड ( राज्य रिपोर्टर ) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघपिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने दिवाळी निमित्त पिंपरी येथील सावली निवारा केंद्राला भेट देऊन तेथील अबाल वृद्ध, निराधार, रुग्ण आदी व्यक्तींना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लहानशा भेटवस्तू स्वरूपात १००१ रुपयाचा धनादेशही देण्यात आला.

यावेळी सावली निराधार केंद्रामध्ये असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आनंदमय वातावरणात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्वांनीच आभार मानले व संघाचे कौतुकही केले.

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, शहराध्यक्ष संतोष रणसिंग,  उपाध्यक्षा उषा लोखंडे, सहसचिव राजेश शिंदे, कोषाध्यक्ष अली इराणी, पत्रकार अविनाश वाघमारे पाटील, आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments