व्यंगावर मात करुन श्रोतांच्या मनावर अधिराज्य करणारा दिव्यांग समाजाचा गौरव - आ. किशोर जोरगेवार

 




व्यंगावर मात करुन श्रोतांच्या मनावर अधिराज्य करणारा दिव्यांग समाजाचा गौरव - आ. किशोर जोरगेवार

देववाणी दिव्यांग बहुउद्देशीय  संस्थेच्या वतीने दिव्यांग मुलांचा संगीतमय कलाविष्कार


 चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )दिव्यांग मुलांना परिपक्व करणे कठीण असले तरी ते अशक्य नाही.  त्यांच्यामधील कलागुण ओळखून  ते  निखारण्यासाठी परिश्रम घेतल्यास त्यांच्यातील उत्तम कलाकार समोर येऊ शकतो. आजचा हा कार्यक्रम याचाच प्रत्यय आणणारा असुन गंध फुलांचा  या कार्यक्रमात आपल्या व्यंगावर मात करुन संगीतातील कलागुणाने श्रोतांच्या मनावर अधिराज्य करणारा दिव्यांग समाजाचा गौरव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
   देववाणी दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रियर्दशनी सांस्कृतीक सभागृह येथे दिव्यांग मुलांचा संगीतमय कलाविष्कार गंध फुलांचा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणुन ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरशहर काँग्रेस कमेटीचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामु तिवारीमहारोगी सेवा समितीचे कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ विकास आमटेपुणे येथील शिक्षक बाल कल्यान संस्थेचे सचिव दत्तात्रय भावे, आम आदमी पार्टीचे सुनील मुसळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले किदिव्यांगामधील दिव्यता शोधने व त्यासाठी परिश्रम करणे अवघड काम आहे. मात्र या संस्थेने हे काम उत्तमरित्या पार पाडले आहे. या संस्थेच्या वतीने सुरु असलेले हे काम कौतुकास्पद आहे. आपण चंद्रपूरात महाकाली महोत्सव सुरु केला आहे. या महोत्सवात चंद्रपूरातील कलाकारांना मोठे व्यावसपीठ उपलब्ध करुन देणे हा ही या मागचा एक उदिष्ट आहे. पूढच्या वर्षी आयोजित होणार असलेल्या महाकाली महोत्सवात दिव्यांग बांधवांनाही त्यांच्यातील कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्या जाईल असे यावेळी ते म्हणाले. दिव्यांगांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी संस्था सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी योग्य असुन यासाठी आपण निधी उपलब्ध करु देऊ. सगळ्यांच्या विकासाची परिभाषा वेगवेगळी असु शकते मात्र समाजातील सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास ही माझ्या विकासाची परिभाषा असल्याचे ते यावेळी म्हणाले. दिव्यांगांचा प्रवास अवघड असतो. मात्र या अवघड प्रवासात देववाणी सारखी एखादी संस्था त्यांच्या जिवणात आशेच्या नव्या किरणा प्रमाणे असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला चंद्रपूरकरांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 



Post a Comment

0 Comments