जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर बनतोय गोरगरीब रुग्णासाठी कत्तलखाना आप चा जिल्हा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप






जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर बनतोय गोरगरीब रुग्णासाठी कत्तलखाना आप चा जिल्हा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

मिराबाई येवले यांच्या मृत्यूला डॉ.सैनी जबाबदार डॉक्टरावर  FIR दर्ज करणार.

7 दिवसांत सामान्य रूग्णालयाची परीस्थिती सुधारा नाहीतर 12 नोव्हेंबर ला राम भरोसे सरकारी दवाखाना असा फलक लाऊन नामकरण करनार - सुनिल मुसळे

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : रुग्णालय आणि तेथील व्यवस्था चंद्रपूर मधील जनते करिता नवीन नाही आहे. आम आदमी पार्टी येथील व्यवस्थेच्या विरोधात सतत आवाज उचलत आलेली आहे.रोज उपचारा अभावी बळी जात आहे. अशातच काल मुल तालुक्यातील श्रीमती मिराबाई दिनकर येवले या 60 वर्षीय महिला रुग्णाला चंद्रपूर जिल्हा रुग्णालय मध्ये दुपारी 12 वाजता भर्ती करण्यात आले होते परंतु त्यांच्याकडे 24 तास उलटल्यानंतर सुद्धा एकाही डॉक्टरने त्यांच्याजवळ येऊन त्यांची विचारपूस सुद्धा केली नाही. त्यांची तब्येत बघितली नाही कोणतेही औषध उपचार त्यांच्यावर झाले नसल्याने त्यांचा उपचारा अभावी मृत्यू झाला. याची माहिती मृतक मीराबाई येवले यांच्या मुलांनी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांना दिली. याबाबत जाब विचारण्याकरिता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले याबाबत संबंधित हजर असलेले डॉक्टर यांना मृत्यूचे कारण विचारले असता सदर पेशंट  हे बीपी मुळे मरण पावल्याचे सांगितले. आणि यांची तपासणी डॉक्टर सैनी यांनी केली असल्याचे तसे सांगितले. आपचे पदाधिकारी यांनी आपण डॉक्टर सैनि यांनी या पेशंटची तपासणी केली हे  कशावरून म्हणता तर त्यांनी मृतकांच्या फाईलवर डॉक्टर सैनि यांची सिग्नेचर असल्याचे सांगितले परंतु मृतकाच्या बेडच्या जवळील पेशंटच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता सर्वांनी मागील 24 तासात एक ही डॉक्टरने या वार्डामध्ये हजेरी लावली नाही तसेच कोणतेही नवीन औषध उपचार दिले नाही. यानंतर जिल्हा रुग्णालयामधील डॉक्टर लोकांचा पेशंट वरती होत असलेला दुर्लक्षपना लक्षात घेऊन आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळ तेथील मेडिकल ऑफिसर जीवने यांच्याकडे संपूर्ण पेशंटचे नातेवाईकांना घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले असता त्यांनी तिथून पळ काढला होता यानंतर याची माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता यांना दिली आणि त्यांना जीवने यांना आपल्या केबिनमध्ये पाठवण्याची विनंती केली असता जीवने हे आमच्या सोबत मिटींगला आहे तुम्ही इकडे येऊन तुमचे प्रश्न मांडू शकता असे म्हटल्यानंतर आम आदमी पार्टी चे पदाधिकारी अधिष्ठाता यांना भेटण्याकरिता गेले असता आप च्या प्रश्नाचे उत्तरे डीन कडे नसल्याने उडवाउडवी चे उत्तरे दिली आम्ही चौकशी करू आम्ही नंतर कारवाई करू असे म्हणत आप च्या पदाधिकाऱ्यांसमोर विषय डावलण्याचा प्रयत्न केला यामुळे आपचे जिल्हाध्यक्ष यांनी जर तुम्हाला जिल्हा सामान्य रुग्णालय ची व्यवस्था सांभाळता येत नसेल तर उगीचच गरीब जनतेचे जिव घेण्यापेक्षा तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आप तर्फे करन्यात आली.
 येत्या 7 दिवसांत दवाखान्यात सुधारणा केली नाही तर येत्या 12 तारखेला रुग्णालयाचे नाव बदलून राम भरोसे सरकारी दवाखाना  असे ठेवू  असा ईशारा आप तर्फे देण्यात आला.
  यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील देवराम मुसळे जिल्हा युवा अध्यक्ष मयूर राईकवार,शहर सचिव राजु शंकरराव कुडे, झोन संयोजक रहेमान खान पठाण, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, निखिल बारसागडे, अनुप तेलतुंबडे, अजय बातव, सुनिल सदभय्ये,सचिन खोब्रागडे, अश्रफ सय्यद ,जितेन्द्र कुमार भाटिया,श्रीनिवासन शेट्टी,तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments