श्रध्दा वालकर प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा देण्यात यावी करिता भाजपा महिला आघाडी बल्लारपूर तर्फे आंदोलन

 









श्रध्दा वालकर प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा देण्यात यावी करिता भाजपा महिला आघाडी बल्लारपूर तर्फे आंदोलन 

◾केस फास्टट्रॅक कोर्टात घेण्यात यावी व लवकरात लवकर दोषी ला फासावर चढविण्यात यावे



बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : वसई महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रध्दा वालकर या तरूणीची दिल्लीत झालेली निघुण हत्या आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटबंना हे सर्वस्व माणुसकीला काळीमा फासनारे आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाई नंतर ५ महीण्यानंतर गुण्हाचा छडा लागला व दोषीला पकळण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. 

आता या निघृन हत्या करणाऱ्या आरोपीस कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहीजे जेने करूण पुढे अशी घटना होवु नये. या खटल्याची केस फास्टट्रॅक कोर्टात घेण्यात यावी व लवकरात लवकर दोषी ला फासावर चढविण्यात यावे तसेच लव जिहाद विरोधात शासनाने कठोर कायदा तयार करावा ज्यामुळे तरूण मुलींना आमिश दाखवुन त्यांचे आयुष्य उध्वस्त होणार नाही. असे निवेदन आज भाजपा महिला आघाडी बल्लारपूर तर्फे पोलीस निरीक्षक तथा तहसीलदार मॅडम यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात आले. सदर निवेदन देताना महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या सौ.रेणुका दुधे, शहर अध्यक्षा सौ. वैशाली जोशी, महामंत्री सौ.कांता ढोके, सौ.वर्षा सुंचूवार, सौ.आरती अक्केवार, तसेच माजी नगरसेविका सौ. सारिका कनकम, सौ.जयश्री मोहूर्ले, सौ.पूनम मोडक, सदस्या श्रीमती सरला लांडे, शैला तावाडे,सुरेखा दांदळे, गुलशन खान,दिपमाला यादव व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.





Post a Comment

0 Comments