आरमोरी तालुका काँग्रेस तर्फे नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा

 







आरमोरी तालुका काँग्रेस तर्फे नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा

◾पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे - तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांचे आवाहन

 आरमोरी ( राज्य रिपोर्टर ) : काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रा संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका काँग्रेस आरमोरी तर्फे नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी रोज शनिवारला ठीक दुपारी १२ वाजता साई दामोदर मंगल कार्यालय आरमोरी येथे होणार आहे.

 या  कार्यक्रमाचे उद्घाटक  म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम तर  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे अध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून  काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा गडचिरोली काँग्रेसचे जिल्हा प्रभारी  डॉ.नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव रवींद्र दरेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातुकुलकर , जि. प.चे माजी सभापती आनंदराव आकरे, सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, अनुसूचित जाती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वृंदाताई गजभिये, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लारेन्स गेडाम, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मनोज वनमाळी, माजी जि.प.सदस्या मनीषाताई दोनाडकर, शहर अध्यक्ष शालिक पत्रे ,माजी पं. स.सभापती अशोक वाकडे,आरमोरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा मंगला कोवे, तसेच सर्व नगरसेवक ,नगरसेविका तालुका व जिल्हा पदाधिकारी काँग्रेस विभाग आरमोरी, काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच व सदस्य तथा सर्व सेलचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.तरी आरमोरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.






Post a Comment

0 Comments