मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक माहिती मार्गदर्शन

 









मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक माहिती  मार्गदर्शन


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक 11/ 11/ 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव निमित्त 31 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 कोर्टा तर्फे कायदेविषयक माहिती मार्गदर्शन हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुषार जी वाजे दिवानी व फौजदारी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी,  P.H. जोशी सह दिवाणी व फौजदारी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, अॅडव्होकेट संदेश हस्ते,अडव्होकेट श्री. पूरी,अॅडव्होकेट विकास गेडाम,अॅडव्होकेट किशोर पुसलवार ,अॅडव्होकेट प्रणय काकडे,अॅडव्होकेट संदिप येणे,अॅडव्होकेट अरविंद तितरे  उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्य प्रतिभा कोतकेलवार उपस्थित होत्या. मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कायदेविषयक माहिती मार्गदर्शन अंतर्गत अॅडव्होकेट संदेश हस्ते यांनी प्रास्ताविक  कायदेविषयक माहिती दिली.

प्रमुख पाहुणे तुषार जी वाजे दिवानी व फौजदारी न्यायाधीश, P.H. जोशी सहदिवानी व फौजदारी न्यायाधीश यांनी सक्तीचे शिक्षण, शिक्षणाचे महत्त्व, वेळेचे महत्व, संविधानाची माहिती, राष्ट्रीय शिक्षण दिन व कायदेविषयक माहिती अतिशय प्रभावीपणे सांगितली. शाळेच्या प्राचार्य कोतकेलवार यांनी अध्यक्षीय  मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वर्ग आठ ते बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आशा टोंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सीमा धाडवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी सर्व शिक्षक रुंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. 





Post a Comment

0 Comments