बल्लारपूर - राजुरा पुलावरुन Ballarpur - Rajura bridge trak fall in Wardha River ; Death of truck driver ट्रक वर्धा नदीत कोसळला ; ट्रक चालकाचा मृत्यू







बल्लारपूर - राजुरा पुलावरुन  Ballarpur - Rajura bridge  trak fall in Wardha River ; Death of truck driver  ट्रक वर्धा नदीत कोसळला ; ट्रक चालकाचा मृत्यू  

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  बल्लारपूर व  राजुरा शहराला जोडण्यासाठी वर्धा नदीवर पूल असून सदर पूल सद्यस्थितीत धोकादायक बनत चालला आहे पावसाळी दिवसात या पुलावर लावलेले कठडे काढून ठेवले जातात जे पावसाळा संपताच पूर्ववत लावले जातात. मात्र वर्तमान स्थितीत या पुलावर लहान मोठे अपघात होऊन अनेकांचा जिव गेल्याचा घटना घडल्या आहेत. अशीच काहीशी घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याचं वर्धा नदीच्या पात्रात ट्रक कोसळून एक चा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती हाती आली असून घटनेची सूचना मिळताच बल्लारपूर पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले असुन बचाव पथकेने तत्काळ बचाव व शोध करत सुरू केले. घटनेत सध्यातरी एका माणसाच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून बचाव पथकाने मृतदेह बाहर काढले आहे.

एकीकडे नदीवरील  पुल सुद्धा जर्जर झाला असून पुलावर देखील प्रचंड खड्डे पडले होते. ह्या पुलावरील खड्डयांमुळे अपघात होऊन वाहने नदीत पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती ती आज खरी ठरली आहे. अशीच काहीशी घटना आज पहाटेच्या सुमारास घडल्याचं वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार आज पहाटे राजुरा व बल्लारपूर शहराला जोडण्यासाठी वर्धा नदीवर पूल  ट्रक क्र. MH 34 TZ 1106 राजुरा पुलावरून जात असतांना तोल गेल्यामुळं वर्धा नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली या घटनेमुळे ट्रक चालकचा  मृत्यू झाला  याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहे.




Post a Comment

0 Comments