Ballarpur Police पॉस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक

  










Ballarpur Police  पॉस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून  शिक्षकाला अटक

◾एका 13 वर्षीय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील प्रतिष्ठित अशा शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका 55 वर्षीय शिक्षकाला एका 13 वर्षीय विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. 

याविषयीच्या अधिक माहीती नुसार बल्लारपूर शहरातील फुलसिंग नाईक वॉर्डातील एक 55 वर्षीय शिक्षक सदर शाळेत शिकवण्यासोबत स्वतःच्या घरी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची  खाजगी शिकवणी घ्यायचा नित्याप्रमाणे 13 वर्षीय विद्यार्थिनी शिकवणी साठी ( ballarpur molest ) गेली असता शिक्षकाने त्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणे सुरू केले असता त्या विद्यार्थिनीने तिथून पळ काढला व या संबंधी आपल्या कुटुंबियांना माहीती दिली. 

कुटुंबीयांनी कसलीही वेळ न दवळता या घटनेची  दि.16/11/2022 ला बल्लारपूर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारी वरुन बल्लारपूर पोलीसानी  ( Ballarpur Police ) कलम  354, 506, 8 पॉस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी सदर शिक्षकाला अटक केली.




Post a Comment

0 Comments