52 वर्षीय शेतक-याचा बिबट्‌याच्या हल्‍ल्‍यात मृत्‍यू

 





52 वर्षीय शेतक-याचा बिबट्‌याच्या हल्‍ल्‍यात मृत्‍यू 

◾विरूर परिसरात पुन्हा वाघाची दहशत


राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रातील थोमापूर परिसरात सध्या शेतपिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान रोखण्यासाठी स्वत:च्या शेतात पहारा देणा-या एका 52 वर्षीय शेतक-याचा बिबट्‌याच्या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झाला.

आज (दि.6) पहाटे  चार वाजताच्या सुमारास विरुर स्टेशन जवळील सुब्बाई तुम्मागुडा येथे घडली.

भीमराव प्रभू घुघलोत (52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो थोमापूर येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार विरुर स्टेशन पासून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुरा तालुक्यातील सुब्बई तुम्मागुडा येथील शेतकरी भीमराव प्रभू घुघलोत वय (52) हा नेहमी प्रमाणे आपल्या शेतात जंगली जनावरकडून होत असलेल्या पिकाची नासधूस रोखण्याकरिता शेतात गेला व शेतात सात फूट उंचीच्या मचाणीवर बसून आपल्या शेतीच्या पिकाचे रक्षण करीत होता मात्र दबा धरून असलेल्या बिबट्याने जगाल करीत असलेल्या शेतकऱ्याचा मचाणीवर चढून भीमराव तीनशे मीटर लांब नेऊन त्याचा जीव घेतला, लगतच्या शेतातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा केली मात्र तोपर्यंत भीमाचा जीव गेला होता व बिबट्याने तिथून पलायन केले. सदर घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ विरुर वनपरिक्षत्राधिकारी पवार व त्याची टीम व विरुर पोलीस ठाणेदार राहुल चव्हाण व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठविण्यात आला. सदर घटनेमुळे परीसरातील जनतेत असंतोष पसरल्यामुळे काही काळ नागरिकांनी घटनेचा तीव्र विरोध दर्शविला. तेव्हा मृतक परिवाराला 25 हजार रोख रक्कम देऊन शासनाकडून मिळणार आर्थिक मदत लवकर देऊ मृतकाच्या मुलाला वनविभागात सेवेत रुज्जू करू असे आश्वासन देण्यात आले .

या घटनेमुळे परिसरात हशत निर्माण झाली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतक-यांनी वनविभागाकडे केली आहे. 




Post a Comment

0 Comments