चंद्रपूर जिल्ह्याचे 5 boxers qualified for Mini Olympics बॉक्सिंग खेळातील 5 खेळाडू मिनी ओलंपिक स्पर्धेकरिता पात्र.

 








चंद्रपूर जिल्ह्याचे 5 boxers qualified for Mini Olympics बॉक्सिंग खेळातील 5 खेळाडू मिनी ओलंपिक स्पर्धेकरिता पात्र.



चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या वतीने आयोजित 91 वी राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा अकोला या ठिकाणी दिनांक 24/11/2022 ते दिनांक 29/11/2022 पर्यंत सुरू असून या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 12 खेळाडूंनी सहभाग नोंदविला उत्कृष्ट प्रदर्शन करीत पाच खेळाडू मिनी ऑलिंपिक स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत.

जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर अंतर्गत जिल्हा क्रीडा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र व चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांचे कारकीर्दीत हे खेळाडू सराव करतात त्यांच्या अथक प्रयत्नांना यावेळी यश आले पाच खेळाडू प्रथमच जानेवारी महिन्यात आयोजित होत असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या मिनी ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा मध्ये सहभागी होतील, बॉक्सिंग क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा या खेळाडूंनी मिळवून दिली व चंद्रपूर जिल्ह्याचे बॉक्सिंग क्षेत्रात एक नावलौकिक केले पात्र ठरलेल्या खेळाडूंची नावे.

1) दीपक केराम 60 की.

2) सुरेश निर्मल 63.5 की.

3) वरून जैन 75 की.

4)अरविंद गजकेश्वर 86 की.

5) खुशाल मांदाळे 92 की.

त्यांच्या या यशाबद्दल श्री. अविनाश पुंड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर, डॉ.बी प्रेमचंद चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे महासचिव डॉ. राकेश तिवारी, भद्रावती तालुका बॉक्सिंग संघटना अध्यक्ष डॉ. मिलिंद रायपुरे, श्री. राजुभाऊ गुंडावार, डॉ. अमित प्रेमचंद, विवेकानंद महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक कु, संगीता बांबोडे, श्री. प्रशांत निकोडे,श्री. अमर भांडारवार,श्री. कोमल वाकडे श्री,आशिष तामगाडगे,अमित शास्त्रकार कु. प्रीती बोरकर,आलोका बिश्वास, लता इंदुरकर यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच राज्यस्तर स्पर्धेत पदकाच्या सुरुवातीसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा या चंद्रपूर जिल्ह्यातून निर्माण होतील अशी शाश्वती राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे यांनी दिली.




Post a Comment

0 Comments