बल्लारपूर ते चंद्रपूर रोडवरील येथील श्री हनुमान मंदिराच्या मुर्तीची तोडफोड प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 24 तासांत घेतले ताब्यात. The accused in the case of vandalizing the idol of Shri Hanuman temple were taken into custody by the police within 24 hours.








बल्लारपूर ते चंद्रपूर रोडवरील  येथील श्री  हनुमान मंदिराच्या मुर्तीची  तोडफोड प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी 24 तासांत घेतले ताब्यात. The accused in the case of vandalizing the idol of Shri Hanuman temple were taken into custody by the police within 24 hours.

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दि.23/11/2022 रोजी रात्री बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत, बल्लारपूर ते चंद्रपूर रोडवरील भिवकुंड नाला , लगत रोडच्या बाजुला असलेल्या  श्री  हनुमान मंदिराच्या मुर्तीची कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून अवहेलना केल्याची घटना घडली.  घटनेबाबत बल्लारपूर पोलीस स्टेशनचे अप.  क्र.  1128 / 2022 कलम  295 भा.द.वि. अन्वये  गुन्हे नोंद करण्यात आला.  Saponi Gaikwad of Post Ballarpur and his team on Gondpipri Road 35 to 40 km from Ballarpur.  At a distance of , a suspicious person was seen walking along the road at night.

सदर घटनेशी संबंधाने  दिनांक 24/11/2022 चे  सकाळी माहिती प्राप्त होताच  घटनेचे गांभीर्य लक्षात  घेवून मा.  पोलीस अधीक्षक श्री.  रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू, मा.  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.  राजा पवार,  पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक पोस्टे  बल्लारपूर उमेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.  त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी  सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीत इसमाचा  तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना आदेश केले.  

  पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी  दिलेल्या आदेशाप्रमाणे  पोलीस   निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात  पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील सपोनि विकास गायकवाड यांचे सोबतच्या  डिबी पथकतील, अनमलदारांचे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वात  सपोनि जितेंद्र संदीप बोबडे, सपोनि संदीप  कापडे,  सपोनि मंगेश भोयर, यांचे  सोबत स्थगुशा. येथील अंमलदाराचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपींची  शोध मोहीम चालू केली.

 सदर  गुन्हा करण्याची पद्धतीचे अवलोकन केले असता सदर मूर्तीची तोडफोड ही कोणीतरी मनोरुग्ण व्यक्तीने केली असे सकृतदर्शनी दिसुन येत असल्याने त्या दृष्टीने शोध मोहीम चालू केली. सदर गुन्हा करण्याच्या पद्धतीचे अवलोकन केले असता सदर मूर्तीची तोडफोड ही कोणीतरी मनोरुग्ण व्यक्तीने केली असावी असे सकृतदर्शनी दिसुन येत असल्याने त्या दृष्टीने शोध मोहीम चालू केली.

सदर घटनास्थळापासून  चारही दिशेला जाणारे वेगवेगळया रोडवरील  रेल्वे स्थानके , बस स्थानक, धाबे व वर्दळीच्या टिकाणी शोध मोहीम चालू केली.दिनांक 24/11/2022 रोजी सदर शोध मोहिमे दरम्यान पोस्टेशन   बल्लारपूर चे सपोनि गायकवाड व त्यांचा पथकाला गोंडपिपरी रोड वर  बल्लारपूर पासुन 35 ते 40 कि.मी.  चे अंतरावर  रात्रीच्या वेळी  रोडने एक संशयीत इसम  जातांना दिसुन  आला.  सदर पथकाने  त्यास ताब्यात घेतले त्या वेळी त्याचे हाताला व कपड्यांना मुर्तीला असलेले तेल मिश्रीत शेंदुर लागल्याचे दिसुन आले.त्यामुळे सदर इसमानेच तोडफोड केल्याची खात्री पटली त्याचेकडे  चौकशी केली असता त्याने मुर्तीची तोडफोड केल्याचे कबुली  केले.

अधिक चौकशी मध्ये तो नागपूर येथील  रहिवाशी  असल्याचे व मागील एक महिन्यापासून घरामधून निघून असाच भटकंती करत असल्याचे दिसुन आले आहे.सकृतदर्शनी सदर इसम हा मनोरुग्ण असल्याचे दिसुन येत असून त्याची सखोल  चौकशी करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.रवींद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर  पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजा पवार यांचे  मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थगुशाखा  चंद्रपूर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि. विकास गायकवाड, सपोनि. रमीज मुलाणी, स.फौ. सलीम शेख, पो.हवा.  आनंद परचाके, सुधाकर वरघणे, सतीश पाटील, लकेश  नायडू,ना.पो.कॉ. सत्यवान कोटनाके, पी.कॉ.  शेखर मातणकर, दिलीप आदे, श्रीनिवास वाभिटकर, प्रसन्ना, मापोको.  सिमा पोरते, चालक ढवस  पोस्टे बल्लारपूर यांनी  केली असून  पुढील तपास पो.नि.उमेश पाटील करत आहेत. 




Post a Comment

0 Comments