राजुऱ्यातील जंगलात मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जुगार खेळतांना साहीत्य असा एकुण ७,५९,११०/- रू. चा मुद्देमाल जप्त ; 11 जुगाऱ्यांना अटक

 









राजुऱ्यातील जंगलात मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास जुगार खेळतांना साहीत्य असा एकुण ७,५९,११०/- रू. चा मुद्देमाल जप्त ; 11 जुगाऱ्यांना अटक

 ◾चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : राजुरा शहरातील अवैध जुगार चालक ईश्वर उर्फ गोलू ठाकरे हा जोगापुरच्या घनदाट जंगलात जुगार अड्डा चालवत असुन नियमितपणे चालणाऱ्या ह्या अड्ड्यावर लाखोंची उलाढाल सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेने सुनियोजितपणे सापळा रचून घातलेल्या धाडीत ३,९२,११०/- रोख रकमेसह एकूण तब्बल साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन 11 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात ०१) हाफीज रहमान खलील रहमान, वय ५३ वर्षे रा. गुरू नगर, विरान टॉकीज रोड, वणी जि. यवतमाळ, ०२ ) अनिल तुळशिराम खोब्रागडे, वय ५४ वर्षे रा. बाबुपेठ वार्ड क्र. ०३ चंद्रपूर, ०३) सैफुद्दीन उर्फ सैफु नन्ने शहा, वय ५५ वर्षे रा. रामपूर भवानी मंदिराजवळ, राजुरा, ०४) दिपक गणपत पडोळे, वय ३८ वर्षे, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर, ०५) राकेश गणपत पडोळे, वय ५० वर्षे रा. अंचलेश्वर वार्ड चंद्रपूर, ०६) मनोज उध्दव कायडींगे, वय ४२ वर्षे रा. बाबापूर सास्ती, राजुरा, ०७) गणेश रामदास सातफाडे, वय ३५ वर्षे रा. वार्ड नं. ०४ गडचांदूर, ०८) प्रदिप दिपक गंगमवार, वय ४१ वर्षे, रा. महाकाली वार्ड चंद्रपूर, ०९) बाल्या उर्फ आनंद किसन बट्टे, वय ३४ वर्षे, रा. इंदिरानगर वार्ड, राजुरा, १०) शंकर विश्वनाथ पटेकर, वय ५६ वर्षे रा. हनुमान मंदिराजवळ सास्ती राजुरा व ११) इजाज खान अजीम खान, वय ४१ वर्षे, रा. मदीना मस्जीद जवळ, तुकुम चंद्रपूर व जुगार भरविणारा इसम नामे १२) गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे, वय अं. २९ वर्षे रा. पेठवार्ड, आंबेडकर चौक राजुरा ह्यांना अटक करून त्यांचे विरूध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करून नमुद आरोपीतांना पुढील कार्यवाही करिता राजुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. 

            प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहीती मिळाली की, राजुरा येथील गोलू उर्फ ईश्वर ठाकरे हा इसम इंदिरानगर जवळील जोगापुर जंगल शिवारात जुगाराचा अड्डा भरवुन जुगार अड्डा चालवित आहे. मिळालेल्या माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तिन पथके तयार करून दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ च्या पहाटे ०२.१५ वाजता जोगापूर जंगल शिवारात चालु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकुण एकुण ११ जुगा-यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळुन नगदी ३,९२,११०/- रू ४२,०००/- रू किंमतीचे एकुण पाच मोबाईल हॅन्डसेट, ३,२५,०००/- रू किंमतीच्या सहा मोटार सायकली व इतर जुगाराचे साहीत्य असा एकुण ७,५९,११०/- रू. चा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि मंगेश भोयर, सपोनि संदिप कापडे, पोलीस अंमलदार स्वामीदास चालेकर, सुरेंद्र महतो, चंदु नागरे, अजय बागेसर, गणेश मोहुर्ले, प्रशांत नागोसे, गणेश भोयर, प्रदिप मडावी, गोपीनाथ नरोटे, विनोद जाधव, चालक प्रमोद डंभारे, दिनेश अराडे यांनी केली.




Post a Comment

0 Comments