नोव्हेम्बर मध्ये होणारी पोलिस भरतीची प्रक्रियाची प्रक्रिया पुढे ढकलली

 



नोव्हेम्बर मध्ये होणारी पोलिस भरतीची प्रक्रियाची प्रक्रिया पुढे ढकलली 

◾वयोमर्यादा वाढण्याची शक्यता 

◾पुढील आठवड्यात निर्णय होण्याचा अंदाज 

मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्य सरकारनं पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी न करता आपली तयारी कायम ठेवावी, असे आवाहन एबीपी माझाकडून करण्यात येत आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्तव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे. मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.



Post a Comment

0 Comments