जी.बी.बी.एम.एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट विद्यार्थ्यांनी मातीचे दिवे रंगकाम करुन शाळेत प्रदर्शनी लाउन विक्री केली.

 



जी.बी.बी.एम.एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट विद्यार्थ्यांनी मातीचे दिवे रंगकाम करुन शाळेत प्रदर्शनी लाउन विक्री केली.     

◾एक अभिनव उपक्रम: विद्यार्थांकडून रंगीत पणती प्रदर्शनी व विक्री 


हिंगणघाट ( राज्य रिपोर्टर ) : दिनाक 20/10/2022 रोजी स्थानिक नगर पालीका संचालीत जी.बी.एम.एम.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथील व्यावसायिक अभ्यासक्रम मल्टी स्किल विषय शिकत असलेल्या वर्ग 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांनी मातीचे दिवे रंगकाम करुन शाळेत प्रदर्शनी लाउन विक्री केली. या उपक्रमात वर्ग 9 वी मधुन निहारीका कडबे,रुतुजा डफ, तर 10 वी मधुन खुशी देशकर, राखी राठोड,प्रणाली हिवरे,श्रावणी वैद्य,भुमिका माने,रितु तड़स,प्राची कुकसे,मयूरी इंगळे,लक्ष्मी वाकडे,तनु दाते,रितु मेसरे,कोमल सातकर,पुनम मेसरे,सोनाली उके इत्यादी विद्यार्थानी सहभाग घेतला.या उपक्रमाचे आयोजक व्यवसाय प्रशिक्षक त्रिरत्न नागदेवे यानी माहिती देताना सांगितले की, या मध्यमातुन विद्यार्थ्यांमधे औद्योगिक  दृष्टिकोण तयार झाला तसेच सामुहिक काम व श्रम व पैशांचे महत्व विद्यार्थाना कळले, विद्यार्थ्यांनी परिक्षा सुरु असुन सुद्धा वेळात वेळ काढून रंगकाम पुर्ण केले त्याबद्दल त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, या उपक्रमातुन येनाऱ्या पैशातुन विद्यार्थी विषया संबंधीत पुस्तके घेणार आहेत तसेच इतर पैसे अनाथ आश्रमाला देणार आहेत विद्यार्थानच्या या कार्यासाठी सर्व स्थरातुन त्यांचे कौतुक होत आहे. उपक्रम यशस्वीकरण्यासाठी शाळेचे प्राचार्य जी एम ढगे,  पर्यवेक्षक सुनील फुटाने, एम एस कुरेशी  तसेच कला शिक्षक किशोर ऊकेकर सर, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक  डॉ. अनिस बेग,  व्यवसाय प्रशिक्षक  श्री. हर्षल बोधनकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments