यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

 



यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज शुक्रवारी क्रांतीवीर शहिद बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिनानिमित्त जिल्हा कारागृहातील शहिद स्मारक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथेमहिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकरसिध्दार्थ मेश्रामसंगीता येरमेबंडु पेंदामसावन उईकरवि मेश्रामदिवाकर मेश्रामसुनिल मेश्रामसाईनाथ मडावीकार्तिक कोडापेरमेश उईकेसविता दंडारे,  आशा देशमुखविश्वजित शाहाहेरमन जोसेफतापोष डेदेवा कुंटाकल्पना शिंदेकिशोर बोलमवारवैशाली मद्दीवार कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    शहिद विर बाबूराव शेडमाके यांची पुण्यतिथी शहिद दिन म्हणून मनवीली जाते. या वर्षीसुद्धा समाज बांधवांच्या वतीने शहीद दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या निमीत्य जिल्हा कारागृह येथील त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन आदरांजली अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

 

शहिद दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मसाला भात व पिण्याच्या पाण्याचे वाटप

शहिद दिनानिमित्त शहिद क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी जिल्हा कारागृहाच्या परिरात जमलेल्या समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मसाला भात व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी असंख्य समाज बाधवांनी याचा लाभ घेतला.  



Post a Comment

0 Comments