बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या जुन्या औष्णिक वीज केंद्रातील पडक्या इमारती निर्लेखीत करा - तहसीलदार डाँ. कांचन जगताप

 



बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या जुन्या औष्णिक वीज केंद्रातील पडक्या इमारती निर्लेखीत करा - तहसीलदार डाँ. कांचन जगताप

◾ बल्लारपूर तहसीलदाराचे अधिकाऱ्यांना निर्देश

◾ वन्य प्राण्याचा वावर थांबविण्यासाठी तातडीने उपाय करा

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या हद्दीतील जुन्या औष्णिक वीज केंद्र परिसर ओसाड झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्या, वाघ व वन्य प्राण्याचा वावर आहे. जुन्या वसाहत परिसरातील पडक्या इमारती याला कारणीभूत असून वन्य प्राण्यांना सुरक्षित ठिकाण आहे.पडक्या इमारती तातडीने निर्लेखीत परिसर सपाट करा, असे निर्देश बल्लारपूर येथील तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.

बल्लारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार यांच्या दालनात विसापूर गावाच्या हद्दीतील जुन्या औष्णिक वीज केंद्राच्या पडक्या इमारतीत बिबट्या, वाघ व अन्य वन्य प्राणी आश्रय घेत आहे. याचा धोका विसापूर गावाकऱ्यांना होत आहे. जीव हाणी टाळण्यासाठी व वन्य प्राणी तथा मानव संघर्ष होऊ नये म्हणून त्या परिसरात तातडीने संरक्षनाबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता हरिश्चन्द्र बालपांडे यांनी जुन्या औष्णिक वीज केंद्रातील पडक्या इमारती निर्लेखीत करून समतल करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसापूर्वी विसापूर येथील उमाजी मशाखेत्री यांची बकरी बिबट्याने गावात येऊन ठार केली होती. त्यावेळी वन विभाग बल्लारपूर यांनी दोन दिवसाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केले होते. मात्र १५ दिवसांनी विकास पाल यांची बकरी ठार केली. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गावाकऱ्यांनी व जनप्रतिनिधिनी बिबट्या, वाघ व वन्य प्राण्याचा बंदोबस्त करा म्हणून बल्लारपूर वन विभाग आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. याची दखल घेऊन बल्लारपूर येथील तहसीलदार डाँ. कांचन जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी घेतली.या बैठकीला महापारेषण चे कार्यकारी अभियंता रोहित रामटेके,कार्यकारी अभियंता एच. एस. बालपांडे,अभियंता एम. एस. तेलंग,विजय कुमार प्रसाद,महेश सत्रे,बी आर. चायकाटे,गट शिक्षणाधिकारी आर. एम. लामगे,विसापूर ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी किशोर धकाते,उपसरपंच अनेकश्वर मेश्राम,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वैभव जोशी, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments