बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सातारा कोमटी मधील गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आला.

 




बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत सातारा कोमटी मधील गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आला.

◾पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर करीत आहे.

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) :  बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र. 439 मध्ये दिनांक 20/10/2022 रोजी सकाळी 11.15 वा. सामुहीक गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आले. सदर वाघ नर असुन वय अंदाजे 3 वर्ष इतके आहे. वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षित आहेत. सदर वाघाचे शवविच्छेदन डॉ. डी. पी. जांभुळे, पशुधन विकास अधिकारी, बल्लारपुर व डॉ . कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकिय अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांनी श्रीमती श्वेता बोड्डु , उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर, तसेच श्री. बंडु धोत्रे, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी, श्री. मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनीधी व श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांचे उपस्थितीत पार पाडले. शवविच्छेदनानंतर वाघाच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले. सदर नमुने परिणा रासायनिक विश्लेषक, जिल्हा न्यायसहाय्यक, वैद्यकिय प्रयोगशाळा नागपुर येथे पाठविण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्युचे कारण सांगता येईल. सदर प्रकरणी प्राथमिक वनगुन्हा क्रमांक 08952/223781/2022 दिनांक 20/10/2022 नुसार जारी करण्यात आलेला आहे. श्रीमती श्वेता बोड्ड उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर व श्री. श्रीकांत पवार सहाय्यक वनसंरक्षक (वनी व वन्य) मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात प्रकरणाचा पुढील तपास श्री. नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह हे करीत आहे. सदर कार्यवाही पुर्ण करण्याकरीता श्री. अब्बास पठाण, क्षेत्र सहाय्यक उमरी, वनरक्षक श्री. प्रशांत धांडे, श्रीमती ज्योती अटेल व कु. पायल शेडमाके यांनी सहकार्य केले. नरेश रा.भोवरे  वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



Post a Comment

0 Comments