काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न : निकालाची उत्सुकता कायम

 



काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न : निकालाची उत्सुकता कायम 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना 1885 मध्ये झाली व काँग्रेसचे प्रथम अध्यक्ष सर एलन ह्यूम यांच्या पासून तर सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पर्यंत अध्यक्ष लाभलेत या पक्षाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असतांना गांधी कुटुंबीयांनी सद्य स्थितीत अध्यक्ष पदासाठी नकार दिल्या नंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी आज 17 ऑक्टोम्बर ला मतदान पार पडले या अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार प्रामुख्याने होते मल्लिकार्जुन खडगे व शशी थरूर यांच्यात लढत असून काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या करिता मतदान केले. 

           याकरिता चंद्रपुर जिल्ह्यातून 16 मतदार तर बल्लारपूर तालुक्यातून 2 मतदार होते यापैकी एक मतदार प्रकृती अस्वास्थतेमूळे   मतदान पासून वंचित राहिले तर बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी  मा. घनश्याम मुलचंदानी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूणच देशभरात आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली असली तरी मात्र आता निकालाची उत्सुकता कायम आहे.



Post a Comment

0 Comments