ग्रामीण पाणीपुरवठा कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवा - राजु झोडे

 



ग्रामीण पाणीपुरवठा कामगारांच्या समस्या तात्काळ सोडवा - राजु झोडे

◾उलगुलान संघटनेचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी कर्मचारी नेमल्या जातात. सदर कर्मचारी हे मागील पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आहे परंतु त्यांच्या वेतनापासून तर त्यांच्या कामावरच्या मूलभूत समस्यांकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे.या समस्याला घेऊन उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन कामगारांच्या समस्या सोडवण्याची मागणी केली.

      निवेदनात कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, त्यांचे हजेरी बुक असावा, कामगारांना ओळखपत्र द्यावे, पगार बँके द्वारा करण्यात यावा, आजपर्यंत त्यांना पीएफ लागू केले नाही ते पीएफ लागू करण्यात यावे, कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साहित्य व यंत्र देण्यात यावे अशा मूलभूत मागण्या करण्यात आल्या. अनेक वर्षापासून सदर कामगार तुटपुंज्या वेतनावर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहे. या जिल्ह्यातील काँग्रेसच्या व भाजपच्या मंत्र्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले. वारंवार मागण्या मागूनही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाही. तरी ग्रामीण पाणीपुरवठा कामगारांना त्यांचे हक्काचे वेतन व अधिकार देऊन त्यांना न्याय द्यावा याकरिता उलगुलान संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली.



Post a Comment

0 Comments